Delhi Fire News :  दिल्लीमधील गोकुळपुरी येथे शुक्रवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या आगीत सुमारे 60 झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही घटना गोकुळपुरी मधील 12 क्रमांकाच्या खांबाच्या आसपासच्या परिसरातील असल्याची माहिती आहे.


दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून, आपण स्वत: घटनास्थळी जाऊन पीडितांची भेट घेणार असल्याचे सांगितले.






विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती


विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितले की, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अतिरिक्त पोलीस उपायुक्त (ईशान्य) देवेश कुमार महला यांनी सांगितले की, आगीची माहिती पहाटे एक वाजेच्या सुमारास दुर्घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.


तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी सर्व बचाव उपकरणांसह घटनास्थळी पोहोचले. पहाटे चारच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीत सुमारे 60 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha