Delhi Earthquake News: दिल्लीत मागील 24 तासांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बुधवारी दुपारी 4.42 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दिल्लीत (Delhi Earthquake) 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी मंगळवारी रात्रीही दिल्लीत भूकंपाचे (Delhi Earthquake) धक्के जाणवले होते. अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर मंगळवारी रात्री दिल्ली-एनसीआरसह (Delhi Earthquake) उत्तर भारताच्या काही भागात जोरदार हादरे जाणवले. रात्री 10.17 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांनंतर लोक घाबरून घराबाहेर पडले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (एनसीएस) अहवालानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून 133 किमी दक्षिण-पूर्वेस होता.
Delhi Earthquake News: हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के
दिल्ली (Delhi Earthquake) व्यतिरिक्त हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. उत्तर काशी आणि चमोलीसह उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपानंतर जम्मू प्रदेशातील काही भागात मोबाईल सेवाही विस्कळीत झाली आहे.
Delhi Earthquake News: तीन महिन्यांत चार वेळा भूकंप
या वर्षात दिल्ली (Delhi Earthquake) एनसीआरमध्ये चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील झोनमध्ये असल्याने दिल्लीबाबत (Delhi Earthquake) अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मांगवारी रात्री दिल्ली (Delhi Earthquake) एनसीआरमध्ये (Delhi NCR) भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते. भूकंपाचे हे धक्के 7.7 रिश्टर स्केल इतके होते. यासोबतच लडाखमध्येही मंगळवारी रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले. लडाखमध्ये बसलेले हे भूकंपाचे धक्के हे 23 सेकंद इतक्या वेळेसाठी होते.
इतर महत्वाची बातमी: