नवी दिल्ली : भारतातील खगोलप्रेमींसाठी आता अवकाशाचा अभ्यास करणं अधिक सोपं होणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Union Minister Dr Jitendra Singh ) यांनी आज उत्तराखंडमधील देवस्थळ इथे आशियामधील सर्वात मोठ्या, चार मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपचे (International Liquid Mirror Telescope) म्हणजे दुर्बिणीचे उद्‌घाटन केले. यावेळी उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंह उपस्थित होते.


उद्घाटनानंतर बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले बळ, प्रोत्साहन आणि प्राधान्यामुळे वैद्यानिकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात एकामागून एक, जागतिक दर्जाचे मानांकन मिळवणारे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सक्षम आणि बनवले आहे, आणि उत्साह दिला आहे.


आजच्या या ऐतिहासिक घटनेने भारताला आकाश आणि खगोलशास्त्रीय रहस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि जगाबरोबर त्याचे आदान-प्रदान करण्यासाठी, क्षमतांच्या नव्या उंचीवर नेऊन पोहोचवले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.


आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस) ने जाहीर केले आहे, की जागतिक दर्जाची 4 मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप (ILMT) आता अवकाशाचा वेध घेण्यासाठी सज्ज आहे. ही दुर्बीण उत्तराखंडमध्ये नैनिताल इथे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत, ARIES या स्वायत्त संस्थेच्या देवस्थळ इथल्या वेधशाळा परिसरात 2450 मीटर उंचीवर बसवण्यात आली आहे. 


डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, ILMT ही केवळ खगोलशास्त्रीय निरीक्षणांसाठी बनवण्यात आलेली  पहिली द्रवरूप मिरर दुर्बीण आहे. देशात सध्या उपलब्ध असलेली ही सर्वात मोठी ऍपर्चर दुर्बीण आहे, तसेच भारतातील पहिली ऑप्टिकल सर्वेक्षण दुर्बीण देखील आहे, असे त्यांनी सांगितले. रोज रात्री आकाशाच्या ठराविक पट्ट्याचे निरीक्षण करताना, ही दुर्बिणी जवळजवळ 10-15 गीगाबाइट डेटा तयार करेल. ILMT द्वारे प्राप्त झालेला अमुल्य डेटा, बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता/मशीन लर्निंग (AI/ML) अल्गोरिदम च्या वापराला परवानगी देईल, आणि ते ILMT च्या मदतीने निरीक्षण केलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी लागू केले जाईल.


International Liquid Mirror Telescope: लिक्विड मिरर टेलिस्कोपमध्ये प्रामुख्याने तीन घटक आहेत: 


i) एक मोठं भांडं, ज्यामध्ये परावर्तित द्रव धातू असतो
ii) एअर बेअरिंग (किंवा मोटर) ज्यावर लिक्विड मिरर बसतो 
iii) एक ड्राइव्ह सिस्टम. 


ही बातमी वाचा: