एक्स्प्लोर

अपघाताचं निमित्त, गर्लफ्रेण्डच्या आईकडून तरुणाची हत्या

अंकित आणि शहजादी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र शहजादीच्या कुटुंबीयांना दोघांनी आंतरधर्मीय लग्न करणं मान्य नव्हतं.

,नवी दिल्ली : दिल्लीतील फोटोग्राफर अंकित सक्सेना हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. अंकितच्या गर्लफ्रेण्डच्या आईने स्कूटरवरुन त्याच्या कारला धडक मारली. त्यानंतर अंकित कारबाहेर येताच त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती. गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दिल्लीत गजबजलेल्या रस्त्यावर 23 वर्षीय अंकितची हत्या झाली होती. अंकितची 20 वर्षीय गर्लफ्रेण्ड शहजादीच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या केल्याचं उघडकीस आलं होतं. अंकित आणि शहजादी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र शहजादीच्या कुटुंबीयांना दोघांनी आंतरधर्मीय लग्न करणं मान्य नव्हतं. शहजादीच्या कुटुंबीयांनी तिला अनेक वेळा अंकितसोबत संबंध तोडण्याचा इशारा दिला होता, मात्र तिने ऐकलं नाही. हत्येच्या दिवशी शहजादी आई-वडिलांवर चिडून घराबाहेर पडली. याच रागातून तिच्या कुटुंबीयांना अंकितला धडा शिकवायचा निर्णय घेतला. हत्येच्या दिवशी काय घडलं? दिल्लीत रघुबीरनगर परिसरात शहजादीची आई स्कूटरवरुन निघाली. तिने जाणूनबुजून अंकितच्या कारला धडक मारली. अंकितला तोपर्यंत ही महिला कोण आहे, याचा थांगपत्ता नव्हता. त्यामुळे अंकित कारमधून बाहेर निघाला. 'रोड रेज' म्हणजेच अपघाताचं निमित्त करुन शहजादीच्या आईने भांडण उकरुन काढलं. शहजादीच्या आईच्या मदतीला वडील, काका आणि धाकटा भाऊ आले आणि त्यांनी अंकितला बेदम मारहाण केली. अंकित आपण निर्दोष असल्याचं ओरडत होता, मात्र इतरांनी त्याला मारहाण सुरुच ठेवली. अंकितची आई जवळच राहत असल्यामुळे ती मुलाच्या मदतीला आली, मात्र शहजादीच्या कुटुंबाने तिच्यावरही हल्ला केला. अंकितच्या मानेवर सुरा चालवला गेला. अखेर आईसमोरच अंकितने तडफडून प्राण सोडला. पोलिसांनी याप्रकरणी शहजादीची आई, वडील, काका आणि अल्पवयीन भावाला अटक केली आहे. अंकित सक्सेना दिल्लीत फोटोग्राफर होता. त्याचं यूट्यूबवर चॅनलही होतं. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्यामुळे त्याचे अनेक मित्र होते. सर्वांनी अंकितच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी फेसबुकवर मोहीम सुरु केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Shield Multi Cancer Detection: फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget