एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजीव गांधींचा 'भारतरत्न' काढून घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत मंजूर
गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा कारण 1984 मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते असा आरोप आप सरकारने केला आहे. याच आरोपामुळे आपने राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्यात यावा, असा प्रस्ताव दिल्लीच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राजीव गांधी यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मात्र राजीव गांधी हे शीख दंगलीतील दोषी असल्याचा आरोप आप सरकारने केला आहे.
गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा कारण 1984 मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते असा आरोप आप सरकारने केला आहे. याच आरोपामुळे आपने राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दरम्यान हा प्रस्ताव व्यक्तिगत पातळीवर सदनात ठेवला गेला असून अजून यावर कुठलाही निर्णय झाला असल्याचे आपचे प्रवक्ते आणि आमदार सौरभ भारद्वाज यांनी सांगितले आहे.Jarnail Singh,AAP MLA: Delhi Assembly today declared 1984 anti-Sikh riots as worst genocide in the history of India’s national capital. In a resolution that has been passed today we have demanded from the Centre that Bharat Ratna should be withdrawn from Former PM Rajiv Gandhi. pic.twitter.com/g9uskxBe36
— ANI (@ANI) December 21, 2018
या प्रस्तावावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. राजीव गांधी यांनी या देशासाठी आपला जीव दिला, मात्र आपने त्यांच्याबाबत जो प्रस्ताव मंजूर केला आहे त्यामुळे आपचा खरा चेहरा जनतेसमोर आला अशीही टीका काँग्रेसने केली आहे. आप ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप अजय माकन यांनी केला आहे.Lines about Late Rajiv Gandhi were not part of resolution placed before house and distributed to the members. One MLA in his handwriting proposed an addition/amendment about Late Rajiv Gandhi. Amendments cannot be passed in this manner.
— Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) December 21, 2018
याच आठवड्यात 1984 च्या शिखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना हजर राहण्याची तंबीही दिली आहे. अशात दिल्ली सरकारने राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.Sh. Rajiv Gandhi sacrificed his life for the country.True colours of AAP have come out in the open!
I have always believed that AAP is the B team of BJP! AAP fielded candidates in Goa,Punjab,MP, Rajasthan, Gujarat, Chhattisgarh just to cut the votes of Congress and help the BJP — Ajay Maken (@ajaymaken) December 21, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement