एक्स्प्लोर

धूम्रपानाला विरोध करणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करत असल्याने गुरप्रीत आणि त्याच्या मित्राने आरोपीला हटकलं. संतापलेल्या आरोपीने दोघांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.

नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणाला रोखणाऱ्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीमध्ये 21 वर्षीय तरुणाची गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. गुरप्रीत सिंग आणि त्याचा 22 वर्षीय मित्र मणिंदर सिंग हे फोटोग्राफीचे विद्यार्थी रात्रीच्या वेळी डॉक्युमेंट्रीच्या शूटिंगसाठी निघाले होते. रात्री एकच्या सुमारास सफदरजंग हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेलपाशी ते थांबले होते. त्यावेळी आरोपी रोहित कृष्ण महंत त्यांच्याजवळ उभा राहून धूम्रपान करायला लागला. सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करत असल्याने दोघांनी त्याला हटकलं. संतापलेल्या आरोपीने गुरप्रीत आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ केली आणि तिघांमध्ये बाचाबाची झाली. इतरांनी हस्तक्षेप केल्यामुळे दोघं जण त्यांच्या बाईकवरुन निघून गेले. रोहितच्या मनात मात्र राग धुमसत होता. त्याने आपल्या गाडीने दोघांच्या बाईकचा पाठलाग केला. दोघांनी जेमतेम 400 मीटर अंतर पार केलं असेल, त्याचवेळी रोहितच्या कारने बाईक जोरदार धडक दिली. कारखाली चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या गुरप्रीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मणिंदरवर उपचार सुरु आहेत. बाईकसोबतच रोहितने आणखी एक रिक्षा आणि टॅक्सीलाही जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी रोहित नशेत असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. अपघातानंतर त्याने पलायन केलं होतं. मात्र त्याला अटक झाल्यानंतर जामिनही मंजूर झाला. रोहित हा आयआयटी दिल्लीच्या एका प्राध्यापकाचा मुलगा असून तो कायद्याचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati And Donald Tusk Meet: युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
NCP Ajit Pawar: राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News:
"ते हात घेणारे नाहीत तर लाखोंना देणारे आहेत", पुण्यात शिवसेनेनं लावले फ्लेक्स, मनोज जरांगे पाटलांना टोला
Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Embed widget