Deenanath Mangeshkar Awards : लोकप्रिय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांना यंदाचा 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' (Deenanath Mangeshkar Awards) पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीकरता 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. 


दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे 2021 साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार त्यांच्या स्मृतीदिनी प्रदान करण्यात येणार आहेत. 24 एप्रिल रोजी षण्मुखानंद सभागृहात मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे वितरण होणार आहे. 


संगीत क्षेत्रातील कामगिरीकरता राहुल देशपांडे यांना 'मास्टर दिनानाथ मंगेशकर' पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा पारेख यांना सिनेक्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सिनेक्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजसेवा आणि नुतन मुंबई टिफीनबॉक्स सर्वीसबद्दल मुंबई डबेवाला यांच्या संघटनेला आनंदमयी पुरस्कार जाहीर झाला आहे. 'संध्या छाया' या नाटकातील श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव आणि निर्माते चंद्रकांत कुलकर्णी यांनादेखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 


मागील अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. 


पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर


पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुरस्काराने 24 एप्रिलला मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Award :  पहिला 'लता दिनानाथ मंगेशकर' पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर


Me Vasantrao : 'मी वसंतराव'चे प्रेक्षकांसह समीक्षकांकडून जोरदार कौतुक


Lata Mangeshkar : 'या' संग्रहालयात आहेत लता मंगेशकरांनी गायलेल्या विविध भाषेतील सात हजार दुर्मिळ गीतांचा संग्रह