Lata Mangeshkar : आधुनिक काळात काही गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. हल्लीच्या काळात सुमधुर गीतांचा खजिना काही मिनिटांमध्ये उघडला जातो. मात्र, पूर्वीच्या काळी गाणी रेकोर्डिंग करण्यापासून ते ऐकण्यापर्यंत मेहनत घ्यावी लागत होती. पूर्वीच्या काळात गाणं ऐकण्यासाठी ग्रामोफोनचा वापर केला जात होता. या ग्रामोफोन रेकोर्डिंगद्वारे गाणी संगीतप्रेमीकडे जात होती. लता मंगेशकर यांच्या एका चाहत्याने त्यांनी गायलेल्या दुर्मिळ गीतांची ग्रामोफोन रेकोर्डिंगचा संग्रह केला आहे. त्यांनी आपल्या घराचे रुपांतर संग्रहालयात केले आहे. 


इंदूरमध्ये या दुर्मिळ गीतांचे संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे मालक सुमन चौरसिया यांनी सांगितले की, मी लहानपणापासून लता मंगेशकर यांचा चाहता आहे. वर्ष 1965 पासून त्यांच्या प्रत्येक गाण्याच्या ग्रामोफोन रेकॉर्ड जतन करण्यास सुरुवात केली, सध्या माझ्याकडे अशा सुमारे 7600 ग्रामोफोन रेकॉर्ड्सचा संग्रह आहे. यामध्ये दुर्मिळ गाण्यांचा समावेश आहे. लता मंगेशकर यांनी हिंदी, मराठीसह 30 विविध भाषांमध्ये गायलेल्या गाण्यांचा समावेश आहे. 


सुमन चौरसिया यांनी वर्ष 2008 मध्ये संग्रहाचे जतन योग्य प्रकारे करण्यासाठी घराचे रुपांतर संग्रहालयात केले. या संग्रहालयाला 'लता दीनानाथ मंगेशकर ग्रामोफोन रेकॉर्ड म्युझियम' असे नाव दिले आहे. चौरसिया यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांचे जन्मस्थळ असलेल्या इंदूरमध्ये त्यांच्या नावाचे संग्रहालय असावे या विचाराने त्यांनी गायलेल्या गाण्याच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स शोधू लागलो. या संग्रहालयात संगीतप्रेमींना, त्यांच्या चाहत्यांना एकाच ठिकाणी त्यांनी गायलेल्या दुर्मिळ गीतांचा आनंद घेता येईल. 


सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम


जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मानही लता मंगेशकरांच्या नावावर आहे. लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. चित्रपटातील गाण्यांव्यतिरिक्तही त्यांनी इतर गाणीही उत्तमप्रकारे गायली आहेत.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha