Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Death Certificate New Rules 1 October 2026 : जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा, 2026 अंतर्गत 1 ऑक्टोबरपासून मृत्यू प्रमाणपत्राच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.

मुंबई : मृत्यू दाखला म्हणजेच डेथ सर्टिफिकेट (Death Certificate) बनवण्यासंदर्भात 1 ऑक्टोबरपासून देशात अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल होणार आहे. मृत्यूच्या नोंदणीत होणारा उशीर आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने नियमांची चौकट अधिक कडक केली आहे. 'जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा, 2026' (Registration of Births and Deaths Amendment Act, 2026) अंतर्गत हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. यामुळे आता नागरिकांना वेळेत नोंदणी करणे बंधनकारक होणार असून उशिरा नोंदणी करणाऱ्यांना विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
What Changes From October 1 : 1 ऑक्टोबरपासून नक्की काय बदलणार?
नवीन नियमांनुसार मृत्यूच्या नोंदणीत जितका जास्त उशीर होईल, तितकीच मंजुरीची प्रक्रिया कठीण आणि जटील होणार आहे.
1 ते 2 वर्षांच्या आत नोंदणी केल्यास : जर मृत्यू झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांच्या आत नोंदणी केली जात असेल, तर आता जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate), उपविभागीय दंडाधिकारी (SDM) किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या (Executive Magistrate) लिखित आदेशाची गरज भासेल.
2 वर्षांनंतर नोंदणी केल्यास : जर मृत्यू होऊन 2 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला असेल, तर प्रथम श्रेणी न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या (Judicial Magistrate First Class) आदेशानंतरच नोंदणी होईल. या प्रक्रियेत अधिकारी घटनेची सत्यता आणि सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी करतील, त्यानंतरच डेथ सर्टिफिकेट जारी केले जाईल.
Where To Apply For Death Certificate : डेथ सर्टिफिकेट कुठे आणि कसे बनते?
स्थानिक प्राधिकरण : मृत्यूची नोंदणी त्याच क्षेत्रातील नोंदणी प्राधिकरणाकडे केली जाते जिथे मृत्यू झाला आहे. हे प्राधिकरण नगरपरिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा संबंधित स्थानिक संस्था असू शकते.
ऑनलाइन सुविधा : अनेक राज्यांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता डेथ सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
रुग्णालयातील मृत्यू : जर मृत्यू रुग्णालयात झाला असेल, तर रुग्णालयाकडून मृत्यूच्या कारणाचा वैद्यकीय दाखला (Medical Certificate) दिला जातो.
Death Certificate Required Documents : डेथ सर्टिफिकेटसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतात (राज्यानुसार काही अतिरिक्त कागदपत्रे लागू शकतात):
रुग्णालय किंवा डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा/मृत्यूच्या कारणाचा दाखला.
मृत व्यक्तीचे नाव, जन्मतारीख आणि जन्मठिकाण दर्शवणारा पुरावा.
माहिती देणाऱ्या अर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.).
रुग्णालयाचे डिस्चार्ज किंवा संबंधित वैद्यकीय कागदपत्रे.
विहीत नमुन्यातील भरलेला अर्ज.
ही बातमी वाचा:
Before You Go
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?






















