एक्स्प्लोर

सरबजीत सिंह यांची बहीण दलबीर कौर यांचा भाजपमध्ये प्रवेश

फाजिल्का (पंजाब) : सरबजीत सिंह यांची बहीण दलबीर कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सरबजीत यांचा 2013 साली पाकिस्तानातील तुरुंगात मृत्यू झाला. त्यांच्या बहिणीने आता भाजपमधून राजकारणात पाऊल ठेवलं आहे. पजाब भाजपच्या किसान मोर्चाचे महासचिव गुरविंदर सिंह यांच्या माहितीनुसार, "दलबीर कौर यांनी मंत्री सुरजीत ज्ञानी यांच्या उपस्थितीत किसान मोर्चाच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे." सरबजीत सिंह यांना पाकिस्तानातील तुरुंगातून सोडवण्यासाठी दलबीर कौर ज्यावेळी संघर्ष करत होत्या, त्यावेळी त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यावेळी त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चाही होत होत्या. एप्रिल 2013 मध्ये लाहोरमध्ये कैद्यांच्या हल्ल्यात सरबजीत सिंह यांचा मृत्यू झाला. सरबजीत यांना पाकिस्तानातील एका कोर्टाने दहशतवादी आणि गुप्तहेर म्हणून दोषी ठरवलं होतं. 1991 साली सरबजीत यांना मृत्युदंडाशी शिक्षाही पाकिस्तानातील कोर्टाने सुनावली होती. त्यानंतर पाकिस्तान सरकारने 2008 मध्ये सरबजीत यांची फाशी अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. दरम्यान, दलबीर कौर यांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हजेरी लावणार होते. मात्र, खराब वातावरणामुळे राजनाथ सिंह किसान मोर्चाच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Shehbaz Sharif : पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Crime News: मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
PM Modi on Gold: परदेशात फिरायला जाऊ नका, विदेशात लग्नसोहळे टाळा, गरज पडलं तरच सोनं विकत घ्या; पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र
परदेशात फिरायला जाऊ नका, विदेशात लग्नसोहळे टाळा, गरज पडलं तरच सोनं विकत घ्या; पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र

व्हिडीओ

GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Vs Laxman Hake : जरांगेंशी चर्चा, हाकेंचा मुंबईकडे मोर्चा | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai PC : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी आमदार डुलक्या मारत होते, संजय राऊतांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waqf Board Decision : वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार, शासनाकडून लवकरच जीआर
वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार, शासनाकडून लवकरच जीआर
Shehbaz Sharif : पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
धक्कादायक घटना... कुटुंबियांची पोलिसांत बेपत्ता म्हणून तक्रार; लिफ्टच्या डक्टमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
धक्कादायक घटना... कुटुंबियांची पोलिसांत बेपत्ता म्हणून तक्रार; लिफ्टच्या डक्टमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Mumbai BMC News : मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget