एक्स्प्लोर

Cyclone Sitrang : सितरंग चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता; 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

Sitrang Cyclone in India : बांगलादेशमध्ये कहर माजवल्यानंतर सितरंग चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. पण याचा परिणाम कायम राहणार आहे. भारतात काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Cyclone Sitrang : सध्या सितरंग चक्रीवादळाचा (Sitrang Cyclone) धोका पाहायला मिळत आहे. बांगलादेशमध्ये कहर माजवल्यानंतर सितरंग चक्रीवादळ जमिनीवर धडकलं आहे. पण याचा परिणाम कायम राहणार आहे. भारतात काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारताशेजारील बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा झटका बसला आहे. आता भारतातही सितरंग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं सितरंग चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारट्टीवर धडकलं. सितरंग चक्रीवादळामुळे बांगलादेशमध्ये आतापर्यंत सुमारे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात अलर्ट देण्यात आला आहे. भारतातही काही भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

आता भारतातही सितरंग चक्रीवादळाचा फटका

भारतातही चक्रीवादळाचा वाढता धोका पाहता अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सितरंग चक्रीवादळाचा 20 हजाराहून अधिक बांगलादेशी नागरिकांना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळानुळे घरे आणि झाड् मोडली आहेत. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आता भारतातही सितरंग चक्रीवादळाचं रौद्र रूप धारण करण्यार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ईशान्येकडील चार राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आसाममधील 80 हून अधिक गावांना वादळ आणि पावसाचा फटका बसला आहे. वामान खात्याकडून नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून बचाव पथकांच्या तुकड्याही पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. भारतात अनेक भागांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये प्रशासन तयारीत असून अनेक भागांमध्ये बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत.

बांगलादेशमध्ये 35 जणांचा मृत्यू

चक्रीवादळामुळे बांगलादेशमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे. बांगलादेशमधील दक्षिण आणि पश्चिम भागात सर्वात वाईट स्थिती आहे. आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर सहा हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं आहे. हजारो मासेमारी प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तयार झालेले सितरंग चक्रीवादळ ईशान्य दिशेने बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकलं. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बांगलादेशला फटका बसला.

चक्रीवादळाचा भारताला धोका कायम

सितरंग चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. पण भारताच्या किनारपट्टीकडील भागात याचा परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सितरंग वादळ सीतारंग किनाऱ्यावर धडकताना त्याची तीव्रता कमी होईल.अनेक राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या वादळाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झालं आहे, तर शेकडो नागरिकांना याचा फटका बसला आहे. याशिवाय बिहारमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्येही काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget