एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'बुलबुल'चे तांडव सुरुच; पुढील 12 तासांत घेणार रौद्ररुप
बुलबुल चक्रीवादळाने पश्चिम बंगालला पार केले असून बांगलादेशाकडे सरकत आहे. पुढील 12 तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं दिली आहे.
कोलकाता : बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं 'बुलबुल' हे चक्रीवादळ दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. ताशी 110 ते 120 किलोमीटर या वेगाने ते ओडिशा, पश्चिम बंगालहून बांगलादेशकडे सरकत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल पार केले असून ते बांगलादेशाच्या जवळ पोहोचले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. याशिवाय किनारपट्टी भागातील 1 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. काल (9 नोव्हेंबर)या चक्रीवादळाचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर होता. तो आज ताशी 135 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बुलबुल चक्रीवादळामुळं पश्चिम बंगालच्या काही किनारी भागांत मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. यात उत्तर आणि दक्षिण भागातील 24 प्रातांचा समावेश आहे. पुढील 12 तासांमध्ये पूर्ण मदिनापूर आणि पश्चिम मदिनापूर, हावरा, नदिया, हुगळी भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 36 तासांमध्ये दक्षिण आसामसह मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममध्येही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बुलबुलमुळं अतोनात नुकसान -
ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्याला बुलबुलचा पहिला तडाखा बसला. चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळं या भागात प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झाले असून बचावकार्य राबवले जात आहे. जिल्ह्यातील अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. ओडिशातील केंद्रपाडा, पुरी, बलासोर, कटक, मयूरभंज आदी ठिकाणच्या शाळांना कालपासून दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
संबधित बातम्या :
पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर मच्छीमार ही संकटात
Cyclone 'Maha' : पालघरमधील शाळा महाविद्यालयांना 8 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा
'महा' चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर 6 ते 8 नोव्हेंबरदरम्या परिस्थिती पाहून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Kyaar Cyclone Effect | कोकण किनारपट्टीला क्यार वादळाचा धोका | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
मुंबई
निवडणूक
Advertisement