Retail Inflation: किरकोळ महागाई (Retail Inflation) दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे. मे महिन्यामध्ये किरकोळ महागाई दरामध्ये घसरण होत हा दर 4.25 टक्क्यांवर पोहचला आहे. एप्रिल महिन्यात हा दर 4.70 टक्के इतका होता. सलग चौथ्या महिन्यात महागाईच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षात मे महिन्यामध्ये किरकोळ महागाई दर हा 7.04 टक्के होता. तर खाद्य महागाई दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खाद्य महागाई दर हा तीन टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 2.91 टक्क्यावर पोहचला आहे. हा दर एप्रिल महिन्यामध्ये 3.84 टक्के इतका होता. तर मे 2022 मध्ये खाद्य महागाई दर हा 7.97 टक्के इतका होता. 


दूध महागाईचा दर जैसे थे


मे महिन्यात जरी किरकोळ महागाई दर कमी झाला असला तरी दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर हे अजूनही 8.91 टक्के इतके आहेत. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यामध्ये दूधाच्या महागाईत वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचे दर हे 8.85 टक्के इतके होते. 


तर तृणधान्य आणि त्याच्याशी संबंधित पदार्थांचा महागाई दर 12.65 टक्के इतका आहे, तर एप्रिलमध्ये हा दर 13.67 टक्के होता. मसाल्यांच्या महागाईत वाढ होऊन हा दर 17.90 टक्के इतका झाला आहे. एप्रिल महिन्यांत मात्र मसल्यांच्या महागाईचा दर हा 17.43 टक्के होता. डाळींच्या महागाईच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून त्यांचा दर हा 6.56 टक्के इतका झाला आहे. 


खाद्य तेलाचा महागाई दर कमी


यावेळी खाद्य तेलांच्या किंमतींमध्ये देखील घसरण झाली आहे. खाद्य तेलांच्या महागाईचे दर 16.01 टक्के इतका आहे. भाज्यांचा महागाई दर हा 8.18 इतका आहे. मीठ आणि माश्यांचा महागाई दर हा 1.29 टक्के इतका आहे. तर साखरेचा महागाई दर 2.51 टक्के इतका आहे. 


कर्जापासून देखील मिळाला दिलासा


जे लोकं नियमितपणे कर्जाचे हफ्ते भरत आहेत, त्यांना किरकोळ महागाई दरात घसरण झाल्याने फायदा होणार आहे.तसेच येणाऱ्या काळामध्ये स्वस्त कर्जांच्या अपेक्षा देखील वाढणार आहेत. कारण आरबाआयकडून येणाऱ्या काळामध्ये किरकोळ महागाई दर हा 5.1 टक्क्यांपर्यंत घसरणार असल्याची शक्यता  वर्तवण्यात आली आहे.  एप्रिलपासून ते जूनमहिन्यापर्यंत महगाई दर हा 4.6 टक्क्यांपर्यंत पोहचणार  असल्याची शक्यता आरबीआयकडून वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मे महिन्यात हा दर चार टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्याचप्रमाणे अशीच परिस्थिती कायम राहिली तर ऑगस्ट 2023 मध्ये आरबीआयची बैठक होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अनेक गोष्टींमध्ये आणखी सवलती मिळू शकतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Noorjahan Mango : अबब! पाच किलोचा एक आंबा, 'आंब्यांच्या राणी'ची सर्वदूर चर्चा; किंमत ऐकून अवाक व्हाल