Haryana CM: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पद्म पुरस्कार (Padma Award) विजेत्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. हरियाणा सरकारकडून (Hariyana Government) पद्म पुरस्कार विजेत्यांना आता पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच सर्व सरकारी बसमधून त्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. दरमहा दहा हजार रुपये हरियाणा सरकार पद्म पुरस्कार विजेत्यांना पेन्शन म्हणून देणार आहे. त्यामुळे पद्म पुरस्कार विजेत्यांसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय हरियाणा सरकारकडून घेण्यात आला आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोमवारी 12 जून रोजी माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली. पद्म पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. त्यामुळे सरकारकडून देखील या पुरस्काराचे महत्त्व जपण्यसाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
याआधी ओडिशा सरकारकडून पद्मश्री विजेते दैतारी नाईक यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी दरमहा दहा हजार रुपयांची पेन्शन सुरु केली होती. बऱ्याच राज्यात पद्म पुरस्कार विजेत्यांची आर्थिक स्थिती ही बिकट असते. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यावेळी ओडिशा सरकारकडून सांगण्यात आलं होतं. ओडिशा सरकारनंतर आता हरियाणा सरकारने देखील हा निर्णय घेतला आहे.
पद्म पुरस्काराने सर्व सामाजिकव क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव करण्यात येतो. त्यामुळे बऱ्याचदा अनेक क्षेत्रातील लोकं काही काळानंतर अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा लोकांना मदत करण्यासाठी म्हणून सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हरियाणा सरकारच्या या निर्णयामुळे पद्म पुरस्कार विजेत्यांना कितपत फायदा होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या महिन्याच्या सुरुवातील हरियाणा सरकारने पद्म पुरस्कार नांमाकित व्यक्तींना आमंत्रित केले होते. यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांसाठी नामांकित व्यक्तींचा समावेश होता. या पद्म पुरस्कारांचे वितरण 26 जानेवारी 2024 रोजी करण्यात येईल.