नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी देशभर लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड 19 लस नोंदणीसाठी आता को-विन (CoWIN) पोर्टल देखील अधिक कार्यक्षम करण्यात आले आहे. आता दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहे. यासोबतच दररोज 50 लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरू केले जात आहे. त्यामुळे नोंदणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.


Pune Corona Update : कोरोनाच्या प्रादुर्भावात बेडसाठी रुग्णांची ससेहोलपट; खाजगी रुग्णालयांच्या हेकेखोरपणापुढं प्रशासन हतबल


रविवारपर्यंत या पोर्टलवर 6 कोटीहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. कोविड -19 लसीकरणावर बनवलेल्या एम्पॉवर्ड ग्रुपचे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांच्या मते, "सिस्टम अपग्रेड करणे ही एक सतत प्रक्रिया आहे आणि भार वाढल्यामुळे, सिस्टमला त्या लोडसाठी अनुकूल करण्यात आले आहे. लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही प्रणाली चार स्तरावर कार्यरत आहे. सार्वजनिक नोंदणीसाठी, पडताळणी पातळी, प्लॅटफॉर्म व्यवस्थापन (लस देणाऱ्या रुग्णालयांसाठी) आणि सर्टिफिकेट जनरेशनसाठी चालवम्यात येत आहे."


Maharashtra Corona Update | आज राज्यात 'इतक्या' कोरोनाबाधितांची वाढ; बरं होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या बाधितांचा आकडा जास्तच


पोर्टलवर फक्त तीन प्रकारची बेसिक माहिती द्यावी लागते
शर्मा म्हणाले की ही शंभर टक्के सरकारकडून चालवण्यात येणारी यंत्रणा आहे. देशातील बर्‍याच भागांतून नोंदणी करण्यात त्रुटी आल्याच्या बातम्या आल्या आहेत. ते म्हणाले की सेल्फ रजिस्ट्रेशन आणि स्पॉट रजिस्ट्रेशन दरम्यान आम्ही फक्त तीन मूलभूत माहिती विचारत आहोत. नाव, लिंग आणि जन्मवर्ष आम्हाला आशा आहे की लाभार्थी योग्य माहिती देतील."


Coronavirus : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; एकूण बाधितांपैकी 84 टक्के रुग्ण 'या' 8 राज्यांत


दुसर्‍या डोससाठी स्वतःच अपॉइंटमेंट घ्यावी लागणार
शर्मा म्हणाले की सध्या को-विनमध्ये दुसर्‍या डोसची अपॉइंटमेंट आपोआप होत नाही. लाभार्थ्यांना लसीच्या दोन डोसांमधील निर्धारित अंतरानुसार त्याचे वेळापत्रक तयार करावे लागेल.