एक्स्प्लोर
COVID-Vaccination | पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस टोचून घेणार!
Corona Vaccine Drive : देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सध्या या अभियानाचा पहिला टप्पा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस टोचून घेणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस टोचून घेणार आहेत. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार, पंतप्रधान लस केव्हा घेणार हे अद्याप समजू शकलेलं नाही.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस दिली जाणार आहे. सामान्य लोकांमध्ये लसीबाबत विश्वास आणि जनजागृती पसरवण्यासाठी पंतप्रधान आणि इतर नेते लस टोचून घेणार आहे. लसीकरण मोहिमेची सुरुवात करताना मोदी म्हणाले होते की, दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल. यानुसार पंतप्रधान मोदीही लस घेणार आहे. मोदींसह देशातील आणखी काही नेते उदाहरणार्थ गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेतेही लस घेणार आहेत.आणखी वाचा























