Covid-19 Cases LIVE : पुन्हा कोरोना! भारतात BF7 सबव्हेरियंचे तीन रुग्ण; कोरोना संदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Coronavirus LIVE Updates : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला आहे. भारतात BF7 सबव्हेरियंचे तीन रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Dec 2022 02:07 PM
Share Market : कोरोना संकटाच्या सावटाने शेअर बाजारात पडझड

Share Market : जागतिक शेअर बाजारात झालेली (Indian Share Market) पडझड आणि कोरोना महासाथीची (Coronavirus) भीती याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकन शेअर बाजार (US Share Market) घसरणीसह बंद झाला. तर, आशियाई शेअर बाजारातही नकारात्मक संकेत आहेत. त्याच्या परिणामी आज भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) मोठी घसरण दिसून येत आहे. निफ्टी निर्देशांक 18000 अंकांखाली व्यवहार करत आहे. 

Corona Outbreak : कोरोनामुळे चीनमध्ये औषधांचा मोठा तुटवडा, भारत करणार मदत

Corona Outbreak : चीनमध्ये (China) कोरोनाची चौथी आणि सर्वात धोकादायक लाट (Coronavirus) आल्याने औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. दररोज लाखो नवीन रुग्ण सापडत असल्याने तसेच रुग्णालयात बेड मिळत नाहीत. अशातच आता औषधांचाही तुटवडा निर्माण झाला असून, औषधांविना नागरिकांचे हाल होत आहेत. आपला शेजारी देश संकटात सापडलेला पाहून भारत (India) पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे.

Corona Outbreak : कोरोनामुळे चीनमध्ये औषधांचा मोठा तुटवडा, भारत करणार मदत

Corona Outbreak : चीनमध्ये (China) कोरोनाची चौथी आणि सर्वात धोकादायक लाट (Coronavirus) आल्याने औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. दररोज लाखो नवीन रुग्ण सापडत असल्याने तसेच रुग्णालयात बेड मिळत नाहीत. अशातच आता औषधांचाही तुटवडा निर्माण झाला असून, औषधांविना नागरिकांचे हाल होत आहेत. आपला शेजारी देश संकटात सापडलेला पाहून भारत (India) पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे.

Pune Covid Update : पुणे विमानतळावर आजपासून प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग सुरु होणार

Pune Covid Update : चीन आणि देशाच्या (Covid) काही भागांमध्ये (Pune) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. याच सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे महापालिकादेखील सज्ज झाली आहे. खबरदारीचा भाग म्हणून पुणे विमानतळावर बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग सुरु करत आहे, असं PMC अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

Covovax Vaccine : कोवॅक्स बूस्टर डोसच्या वापराला मंजुरी द्या; कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटची मागणी

Corona Booster Dose : जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट BF.7 ने धुमाकूळ घातला असून त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतात आता खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच वेळी कोरोनाचा हा प्रसार रोखण्यासाठी कोवॅक्स लसीच्या बूस्टर डोसच्या (Covid-19 Vaccine Covovax) वापराला परवानगी देण्यात यावी अशी मागणी सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute of India) केंद्र सरकारकडे केली आहे. ज्या लोकांनी या आधी कोविशिल्डच्या दोन लसीची मात्रा घेतली आहे अशा लोकांना हा बूस्टर डोस देण्यासाठी मंजुरी देण्यात यावी अशी  मागणी करमय्ता आली आहे.

Nasal Corona Vaccine : भारतात आता नाकावाटे कोरोना लस

Nasal Corona Vaccine : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोना संदर्भातील आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने प्रौढांसाठी नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी देत बूस्टर डोस म्हणून नेझल कोरोना वॅक्सिनची शिफारस केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नेझल वॅक्सिनला तज्ज्ञांच्या समितीने 18 वर्षांवरील नागरिकांवरील वापरासाठी मंजुरी दिल्याचं सांगितलं आहे. मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, आता तज्ज्ञांच्या समितीनेही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे, यामुळे येत्या काही दिवसांत कोणत्याही व्यक्तीला इंजेक्शनद्वारे कोरोना लस घेण्याची गरज भासणार नाही आणि थेट नाकावाटे कोरोना लस देण्यात येईल.

Coronavirus Cases Today in India : देशात आज 163 नव्या रुग्णांची नोंद

भारतात गेल्या 24 तासांत 163 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांहून कमी आहे. सध्या देशात 3,380 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.





Covid 19 Updates : परदेशातून विमानाने येणाऱ्या रॅन्डम प्रवाशांची चाचणी होणार

चीनसह जगभरातील इतर देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना भारतात त्यासंबंधी आता खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी नागरी हवाई उड्डाण सचिवांना एक पत्र लिहिलं आहे. त्यानुसार प्रत्येक फ्लाईटमधून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची आता विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे. या चाचणीसाठी रॅन्डम प्रवाशांची निवड एअरलाइन्स ऑपरेटरच करणार आहेत. जपान, दक्षिण कोरिया, फ्रांस, ब्राझील आणि चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं केंद्रीय आरोग्य सचिवांनी हे पत्र लिहिलं आहे. 

Corona Health Advisory : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IMA कडून मार्गदर्शक सूचना जारी, देशवासियांना दिला 'हा' सल्ला

IMA Advisory on Corona : भारतात केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्यास आणि मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याआधी सरकारने बुधवारी झालेल्या बैठकीनंतर लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे पाळण्याचे आवाहन केले. राज्यांना कोरोना संदर्भातील पुढील रणनीती आखण्याची सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार खबरदारीचे उपाययोजना करताना दिसत आहे.

Coronavirus : महाराष्ट्र सरकार कोरोना नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवणार

Maharashtra Govt on Genome Sequencing : महाराष्ट्र सरकार आता कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग (Genome Sequencing) करणार आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) सूचनेनुसार राज्य सरकारने (Maharashtra Government)  हा निर्णय घेतला आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग (Coronavirsu Outbreak) पाहता केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या. या सूचना गांभीर्याने घेत राज्य सरकारने नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे

Covid-19 Alert for India : राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

Union Health Minister Meeting : भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळल्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज 23 डिसेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीया यांनी गुरुवारी राज्यसभेत भारतातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

Coronavirus in India : गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना

Coronavirus Updates in India : ''सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत,'' अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी लोकसभेत (Lok Sabha and Rajya Sabha) बोलताना दिली आहे. 

Rahul Gandhi on Corona : 'कोरोना पसरत आहे, मास्क लावा, यात्रा थांबवा, ही सर्व सरकारची बहाणेबाजी', राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रा' रोखण्यासाठी केंद्र सरकार निमित्त शोधत असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी केला आहे. चीनसह काही देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  वाढत्या रुग्णांची संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून त्यांना यात्रा थांबण्याचे आवाहन केले होते. आपल्या पत्रात ते म्हणाले होते की, जर कोविडचे (Coronavirus) नियम पाळता येत नसतील, तर त्यांनी यात्रा थांबवण्याचा विचार करावा.

China Covid Death: चीनमध्ये दररोज 10 लाख कोरोना रुग्ण, पाच हजार मृत्यू; Bloomberg च्या रिपोर्टनं जगाचं टेन्शन वाढवलं

Covid Outbreak : 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण नोंदवल्या गेलेल्या चीनमध्ये कोव्हिड संकट पुन्हा गहिरं बनलंय. नव्या व्हेरिअंटच्या शिरकावाने चीनची आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. चीनमध्ये सुपरफास्ट स्पीडने वाढणारी कोव्हीड रुग्णसंख्या जगाची डोकेदुखी वाढवणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय. ब्लूमबर्गच्या नव्या रिपोर्ट्सनुसार जगाचं टेन्शन पुन्हा एकदा वाढणार आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये एका दिवसात तब्बल 10 लाख कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. तर दररोज पाच हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.

Covid-19 Nasal Vaccine : नाकावाटे दिली जाणार कोरोना लस, तज्ज्ञ समितीकडून लसीच्या वापराला मंजुरी

Coronavirus Nasal Vaccine : भारतात आता नाकावाटे कोरोना लस (Nasal Corona Vaccine) दिली जाणार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या समितीकडून नेझल कोरोना वॅक्सिन वापरण्यास मंजुरी दिली आहे.  एकीकडे जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगात ओमायक्रॉन आणि त्याचा BF.7 सबव्हेरियंट याचा वेगाने संसर्ग होत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे तीन रुग्ण सापडल्याने प्रशासन अलर्टवर आलं आहे. केंद्र सरकारकडून कोरोना संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकांचा धडाका सुरु आहे. केंद्र सरकारने बुधवारपासून कोरोनाबाबत अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Covid19 : कर्नाटकात मास्कसक्ती, महाराष्ट्रातही होणार? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर

Masks Mandatory in Karnataka : भारतात ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे तीन रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये (Karnataka) मास्कसक्ती (Mask) लागू करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने बंद ठिकाणी (Closed Places) आणि एसी रूममध्ये (AC Room) मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढाव्यासंदर्भातील गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारने मास्कसक्तीची घोषणा केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, बंद ठिकाणी आणि एसी रूममध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे.

पार्श्वभूमी

Coronavirus Updates : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला आहे. भारतात BF7 सबव्हेरियंचे तीन रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. जगभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, प्रशासन अलर्टवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विषाणूच्या नवीन स्वरूपाचे निरीक्षण करण्यासाठी संक्रमित आढळलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग वाढविण्याचे आवाहन केले. याआधी मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या नवीन प्रकारांचे निरीक्षण करण्यासाठी संक्रमितांमध्ये आढळलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग वाढविण्याचे आवाहन केले होते.


चीनमध्ये कोविड रुग्णांची (Covid) संख्या अचानक वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात (India) उद्रेक होऊ नये. यासाठी आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच भारतात पुन्हा मास्क बंधनकारक (Mask Compulsory) करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी सांगितलंय. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या


कर्नाटकात मास्कसक्ती, महाराष्ट्रातही होणार? 


वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये (Karnataka) मास्कसक्ती (Mask) लागू करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने बंद ठिकाणी (Closed Places) आणि एसी रूममध्ये (AC Room) मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढाव्यासंदर्भातील गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारने मास्कसक्तीची घोषणा केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, बंद ठिकाणी आणि एसी रूममध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे.


कर्नाटकमध्ये मास्कसक्ती लागू


कर्नाटक सरकारने खबरदारी म्हणून नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, बंद ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोविड-19 चाचणी केली जाईल. रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर, प्लांट आणि जनरेटर तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.


घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा : अदर पूनावाला


जगभरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी भाष्य करत भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं. याबाबत पूनावाला यांनी ट्वीट केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.