एक्स्प्लोर

Vaccination : ‘कोव्हिशील्ड’वाले आणि ‘कोवॅक्सिन’वाले; देशात दोन नवे वर्ग, केरळ उच्च न्यायालयाची टिपण्णी

Vaccination : केंद्राच्या लसीकरण योजनेमुळे देशात दोन नवे वर्ग तयार झाले आहेत.

Vaccination : केंद्राच्या लसीकरण योजनेमुळे देशात दोन नवे वर्ग तयार झाले आहेत. यापैकी कोव्हिशील्ड (Covishield) एक आणि दुसरा कोवॅक्सिन (Covaxin). कोव्हिशील्ड घेतलेले कुठेही भ्रमंती करु शकतात, पण कोवॅक्सिनधारकांना मात्र मर्यादा आहेत. मंगळवारी केरळ उच्च न्यायालयानं (Kerala High Court) एका सुनावणीदरम्यान वरील वक्तव्य म्हटलं आहे. सौदीमध्ये वेल्डिंगचं काम करणाऱ्या एका व्यक्तीनं केरळ उच्च न्यायालयात याबाबत अर्ज केला होता. न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन यांच्यापुढे मंगळवारी सुनावणी पार पडली.  सौदी अरेबियामध्ये वेल्डिंगचं काम करणाऱ्या एका भारतीय व्यक्तीला कोव्हॅस्किन लस घेतल्यामुळे देशाबाहेर जाता येत नाही. सौदी अरेबियानं अद्याप कोवॅक्सिन लस घेणाऱ्यांना अद्याप देशात प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा सौदीमध्ये जाण्याचा मार्ग बंद आहे. त्या व्यक्तीवर नोकरी गमावण्याचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीनं केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. यामध्ये त्या व्यक्तीनं आंतरराष्ट्रीय मान्यता असलेली कोव्हिशील्ड लस घेण्याची मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. मंगळवारी याबाबतची सुनावणी पार पडली.  

सुनावणीवेळी न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन म्हणाले की, ‘सरकारच्या लसीकरण मोहिमेमुळे देशात कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड असे दोन वर्ग तयार झाले आहेत. यापैकी कोवॅक्सिन घेणाऱ्या व्यक्तींच्या संचारावर प्रतिबंध आहे. तर दुसरा वर्ग कोव्हिशील्ड देशात आणि देशाबाहेरही भ्रमंती करु शकतो. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या मूलभूत हक्काला बाधा पोहचली आहे.’ न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन यांनी याचिकाकर्त्याची कोव्हिशील्ड लस घेण्याची याचिका फेटाळून लावली. एका महिन्यात सरकारने याचिकाकर्त्यांच्या समस्यावर मार्ग काढण्याचे आदेशही दिले आहेत.

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्याची याचिकाही फेटाळली -

मंगळवारी केरळ उच्च न्यायलयानं कोरोना (COVID-19) लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढण्यात यावा, ही याचिकाही फेटाळली. न्यायमूर्ती एन. नागरेश यांच्यापुढे सुनावणी पार पडली होती. याचिकाकर्त्याचं असं म्हणणं होतं की, लसीकरण प्रमाणपत्र हे खासगी स्थान आहे. त्यावर त्यांचे काही अधिकार आहेत. न्यायमूर्ती एन. नागरेश यांनी ही याचिका फेटाळली. यावेळी ते म्हणाले की, हा एक धोकादायक प्रस्ताव आहे. उद्या इथं कुणी येऊन महात्मा गांधी यांना पसंत करत नाही, असं म्हणत नोटा-नाण्यावरील त्यांचं छायाचित्र काढण्याची मागणी करु शकतो. कष्टानं कमावलेली रक्कम आहे, त्यावर महात्मा गांधी यांचा फोटो पाहू शकत नाही, असं याचिकाकर्ता म्हणेल. तेव्हा काय होईल? यावर अजित जॉय यांनी युक्तीवाद केला. मात्र,  नागरेश यांनी ही याचिका फेटाळून लावली. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Election Age Limit 21 : Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव आणणार
Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव आणणार
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget