नवी दिल्ली: कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी आता जगभरात लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जगातील सुमारे 10 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे तीन कोटी 28 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. भारताचा या बाबतीत जगात पाचवा क्रमांक लागतोय.


ब्लूमबर्गच्या व्हॅक्सिन ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत करण्यात आलेले कोरोना लसीकरण हे जगातील एक तृतीयांश इतकं आहे. धक्कादायक म्हणजे जगातील सर्वाधिक गरीब असे 29 देश आहेत जिथे अद्याप कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकली नाही.


लोकसंख्येच्या प्रमाणात आकडेवारी काढली तर इस्त्रायलमध्ये सर्वाधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. इस्त्रायलमध्ये आता पर्यंत 37 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये अनेक लोकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे.


कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी पीएम केअर्स फंडमधून 80 टक्के निधी


कोरोनाच्या पहिल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात होऊन आता 60 दिवस पूर्ण झाले आहेत. पहिली लस ही रशियात 5 डिसेंबर रोजी देण्यात आली होती. रशियाच्या या स्पूटनिक व्ही लसीला अद्याप जागतिक मान्यता मिळाली नाही. जगातील अनेक देशांत रशियाच्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.


भारत पाचव्या स्थानी
अमेरिकेत लसीकरणाला 14 डिसेंबर पासून सुरु करण्यात आले होते. त्या देशात आतापर्यंत तीन कोटी 28 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये आतापर्यंत दोन कोटी लोकांना लस देण्यात आली असल्याचं सांगण्यात येतंय. चीन नंतर ब्रिटनचा क्रमांक लागतोय. त्या देशात एक कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. चौथ्या स्थानी इस्त्रायल आहे. तर भारताचा पाचवा क्रमांक लागतोय. भारतात आतापर्यंत 41 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे.


UK Corona Update: ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 18 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 406 रुग्णांचा मृत्यू