नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर काटेरी तार, बॅरिकेड्स आणि बोल्डर्स लावून पोलिसांनी तटबंदी केली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाणारे सर्व रस्ते देखील बंद केले आहेत. या दरम्यान शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले आहे. रिहानाच्या या ट्वीटवरून कंगनाने निशाणा साधला आहे. "आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही", अशी टीका केली.


पॉपस्टार रिहानाने आंदोलनस्थळी इंटरनेट बंदची बातमी शेअर करत ट्वीटमध्ये लिहिले की, "आपण या विषयावर का बोलत नाही?" असा सवाल उपस्थित करत #FarmersProtest हा हॅशटॅग वापरला आहे. रिहानाच्या या ट्वीटनंतर कंगना भडकली.


कंगना नेमकं काय म्हणाली?


कंगनाने ट्वीट केले, "या विषयावर कोणी बोलत नाही कारण आंदोलन करणारे शेतकरी नसून आतंकवादी आहे. जे भारताच्या एकतेला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे चीन आपल्या देशावर हल्ला करेल आणि अमेरिकेसारखी चायनीज कॉलनी बनवेल. शांत रहा आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही जो आपला देश विकू"





रिहाना कायमच सोशल मीडियावर विविध मुद्द्यावर व्यक्त होत असते. रिहानाने मंगळवारी म्यानमारच्या मुद्द्यावर देखील ट्वीट केले आहे.


या अगोदर कंगनाने ट्विटरवर अनेक बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच गायक दिलजीत दोसांझ आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्यावर टीका केली.
दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करणं कंगना रनौतला महागात पडलंय. शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सहा मोठ्या ब्रॅण्ड्सनी तिच्यासोबतचे आपले करार रद्द केले आहेत.


संबंधित बातम्या :



Tractor Rally Violence: शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला महागात, सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द


कोर्टाला हमी देऊनही कंगनाकडून सोशल मीडियाचा वापर, तक्रारदारांच्यावतीनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र