UK Corona Update | ब्रिटनमध्ये कोरोनाचा हाहाकार अजूनही सुरुच आहे, दररोज नवीन आकडेवारीवरून हे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये ब्रिटनमध्ये 18 हजार 607 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर 406 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा 38 लाख 35 हजार 783 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 6 हजार 564 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाबाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन वेगाने पसरतो आणि त्याच वेळी त्याचा परिणाम अधिक तीव्र होतो.


ब्रिटनमध्ये 17 जुलैपर्यंत लॉकडाऊन


देशात कोरोनाने निर्माण केलेल्या चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने 17 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी, देशातील सर्व सार्वजनिक ठिकाणं पूर्णपणे बंद असतील. रेस्टॉरंट्स, बार, पब, कॅफे, सिनेमा हॉल, मार्केट यासह इतर सर्व ठिकाणे पूर्णपणे बंद आहेत. या साथीमुळे देशातील लोकांना घरातच राहावे लागत आहे.


ब्रिटनमध्ये कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर पकड मिळवण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामुळे देशातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. देशातील लॉकडाऊनचा परिणाम पुढील सहा महिन्यांतील रोजगारांवर निश्चितच परिणाम होईल. लोकांना खाण्यापिण्याची अडचण होईल. व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, लोकांना इतर अनेक क्षेत्रात त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे वेळेत कोरोनाची स्थिती नियंत्रणात न आल्यास कोरोनातून सावरणे ब्रिटनला कठीण जाऊ शकतो.