नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. तर दुसरीकडे या मुद्यावरुन संसदेत देखील मोठा गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्षांकडून या मुद्यावर आज जोरदार गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी करत आहे. काल देखील दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळानंतर कामकाज स्थगित करण्यात आले होते. दिल्लीच्या सिंघु, टिकरी आणि गाजीपूर सीमेवर शेतकरी जिथं आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी सीमेंटचे अवरोधक, अनकुचिदार तारा, रस्त्यांवर खिळे लावण्यात आले आहेत, सोबतच मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, यावरुन विरोधी पक्षाने संसदेत जोरदार हल्लाबोल केला.


आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही
नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार कुठलीही नुकसान भरपाई देणार नाही. केंद्र सरकारच्या वतीने याबाबत लोकसभेत अधिकृत माहिती देण्यात आली. 70 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनात दीडशेपेक्षा जास्त शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी अनेक वेळा चर्चा केली. कोविडची परिस्थिती, दिल्लीतील थंडी आणि इतर गोष्टी पाहता लहान मुलं, महिला आणि वयोवृद्धांना घरी पाठवावं अशी विनंतीही केंद्र सरकारनं केली आहे.


Farmers Protest | आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती


देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली - राकेश टिकैत
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ दिला असून जर मागण्या मान्य झाल्या नाही देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल असा इशारा दिला आहे. राकेश टिकैत म्हणाले, आम्ही सरकरला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. जर तोपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही देशात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल.


ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास देशभरात 40 लाख ट्रॅक्टर्सची रॅली काढणार : राकेश टिकैत 


6 फेब्रुवारीला देशभरात 'चक्का जाम'


संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून 6 फेब्रुवारीला 'चक्का जाम' करण्याची घोषणा केली आहे. 6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाअंतर्गत रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी दिला.