Coronavirus India : कोरोनाबाधितांच्या संख्येत 10 टक्क्यांनी घट, मागील 24 तासांत दोन लाख बाधित
Coronavirus India : देशात मागील 24 तासांत 2 लाख 9 हजार 918 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. देशात कोरोनाचा जोर ओसरत असल्याचे चित्र आहे.
Coronavirus in India : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 2 लाख 9 हजार 918 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशात 18 लाख 31 हजार 268 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर संसर्गाचा पॉझिटीव्हीटी दर हा 15.77 टक्के इतका झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 959 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 62 हजार 628 जणांनी कोरोनाच्या आजारावर मात केली आहे. देशात 1,66,03,96,227 जणांना कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात 22 हजार 444 नवीन कोरोनाबाधित
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. तर 39,015 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.14 टक्के इतका झाला आहे. रविवारी राज्यात 50 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्के एवढा आहे. राज्यात 2,27,711 इतके सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 77,05,969 इतकी आहे.
मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर
रविवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 1160 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, 2530 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत 10 हजार 797 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहचला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Corona Vaccine : कोविन अॅपवर नोंदणीनंतरच मेडीकलमध्ये मिळणार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन
- India Corona Vaccination : लसीकरणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार, 75 टक्के प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण
- Coronavirus Vaccine : नेझल वॅक्सिन ठरणार गेमचेंजर? एम्समधील तज्ज्ञ म्हणतात...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha