एक्स्प्लोर

Coronavirus Today : देशात पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासांत 43,733 रुग्णांची नोंद

Coronavirus Today : आज दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा वाढला असून देशात गेल्या 24 तासांत 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Coronavirus Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव घटताना दिसून येत असलं तरी धोका अद्याप टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून देशात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. परंतु, आज दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा वाढलेला दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 47,240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.18 टक्क्यांवर पोहोचला आहे.  

गेल्या 24 तासांत 930 कोरोनाबाधितांचा मृत्यू 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनामुळे 930 रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 4 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

देशातील सध्याची कोरोना स्थिती : 

एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 5 लाख 63 हजार 665
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 97 लाख 99 हजार 534
एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 59 हजार 920
एकूण मृत्यू : 4 लाख 4 हजार 211
आतापर्यंत एकूण लसीकरण : 36 कोटी 13 लाख 23 हजार 548

आतापर्यंत एकूण 42 कोटी 33 लाख 32 हजार 97 सॅम्पल्सची तपासणी 

आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात काल कोरोना व्हायरससाठी 19 लाख 7 हजार 216 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 42 कोटी 33 लाख 32 हजार 97 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. 

राज्यात सोमवारी 10, 548 रुग्णांना डिस्चार्ज, 8,418 रुग्णांची भर

राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात काल 8, 418 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 548 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 58 लाख 72 हजार 268 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.06 टक्के आहे. 

राज्यात काल 171 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.02 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 14 हजार 297 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (50), हिंगोली (84), गोंदिया (89) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,524 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्या शुन्यावर 

भंडारा जिल्ह्यात काल शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1328 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,29,08,288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,13, 335(14.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,38,832 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,487 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 453 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.  मुंबईत गेल्या 24 तासात 453 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,99,823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,908 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 822 दिवसांवर गेला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget