नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मागील 24 तासांमध्ये 8171 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तसेच 204 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात एक लाख 98 हजार 706 कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 5598 लोकांचा मृत्यू झाला असून 95 हजार 527 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.
देशातील एकूण कोरोना बळींपैकी 94 टक्के मृत्यू फक्त 8 राज्यात
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार हा काही राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 98 हजार 706 इतका आहे. तर 5598 लोकांचा मृत्यू झाला असून 95 हजार 527 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, देशातील एकूण बळींपैकी 94 टक्के बळी हे फक्त 8 राज्यात झाल्याची नोंद झाली आहे.
जवळपास 75 टक्के रुग्ण आणि 83 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यांमध्ये
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 75 टक्के रुग्ण आणि 83 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यांमध्ये झाले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या एकूण रुग्णांपैकी 75.33% रुग्ण ज्या 6 राज्यांमध्ये आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश होतो. सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्र, तमिलनाडु, दिल्ली आणि गुजरातमध्ये आहे. या राज्यांमध्ये दररोज वेगाने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
पाहा व्हिडीओ : राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला, आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून दिलासादायक माहिती!
कोरोनामुक्त होणाऱ्यांचा सरासरी वेग 48.19%
देशात उपचारानंतर कोरोनामुक्त होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांचा सरासरी वेग 48.19 टक्के इतका आहे. उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा सरासरी दर 18 मे रोजी 38.29% इतका होता. 3 मे रोजी 26.59% एवढा होता आणि 15 एप्रिल रोजी हा दर 11.42% एवढा होता. सध्या देशात 93,322 लोकांवर उपचार सुरु आहेत.
लॉकडाऊन वाढला
देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
भीम अॅपच्या 70 लाख युझर्सचा डेटा ऑनलाईन लीक झाल्याचा इस्त्रायली फर्मचा दावा, सरकारने दावा फेटाळला
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, मजुरांसह सूक्ष्म, लघु अन् मध्यम उद्योगांसाठी मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांचं अर्थमंत्रीपद राहणार की जाणार? केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा