नवी दिल्ली : डिजीटल भारत मोहिमेअंतर्गत ज्या भीम अॅपचा जोरदार प्रचार सरकारकडून केला जात आहे. त्या भीम अॅपच्या सुरक्षितेतबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी आहे. हे अॅप वापरणाऱ्या तब्बल 70 लाख नागरिकांचे वैयक्तिक रेकॉर्ड्स हे लीक झाल्याचा दावा एका इस्त्रायली सायबर सिक्युरिटी फर्मने केला आहे. पण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या संस्थेनं मात्र असा कुठलाही डेटा लीक झाल्याचा दावा फेटाळला आहे.


केंद्र सरकारच्या संयुक्त सहकार्यानं सीएससी- ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस या कंपनीनं भीम अॅप तयार केलं होतं. नोटबंदीनंतरच्या काळात डिजिटल भारत या संकल्पनेवर जोर देत मोदी सरकारने या भीम अॅपचा जोरदार प्रचार केला होता. पण यावरचा डेटा हा दोषपूर्ण अशा अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस एस-3 बकेटमध्ये सेव्ह झाल्याचा दावा इस्त्रायली कंपनीनं केला आहे.


व्हीपीएन मेंटॉरस या इस्त्रायली सायबर सिक्युरीटी फर्मचा हा दावा आहे. 409 गिगाबाईट इतका डेटा लीक झाला असून त्यात युझर्सची वैयक्तिक माहिती, आधार कार्ड डिटेल्स, रहिवाशी प्रमाणपत्र, बँक रेकॉर्ड्ससह इतर तपशीलही लीक झाल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र त्यावर सरकारने मात्र हा दावा फेटाळला आहे.


सरकारचं काय स्पष्टीकरण आहे?


भीम अॅपमध्ये डेटा लीक झाल्याच्या काही बातम्या आमच्या निदर्शनास आल्या. पण आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की भीम अँप अशा पद्धतीनं युझर्सच्या डेटा सुरक्षितेबाबत कुठलीही तडजोड करत नाही. सर्वांना विनंती आहे की त्यांनी अशा कुठल्याही कपोलकल्पित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. एनपीसीआय अत्यंत उच्च दर्जाचे सुरक्षा तंत्रज्ञान वापरते आणि युझर्सच्या डेटा सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. पेमेंटची अत्याधुनिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पुढेही राहू.


संबंधित बातम्या




VIDEO | मंदीत संधी! नोकरी गमावलेल्यांसाठी शेळीपालन उत्तम पर्याय,लहान जागेत शेळीपालन करणं शक्य,स्थलांतरितांसाठी मोठी संधी