एक्स्प्लोर

Coronavirus | देशातील कोरोना बाधितांचा आकडा 2 लाखांच्या उंबरठ्यावर; गेल्या 24 तासांत 204 मृत्यू

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना बाधितांचा आकडा 2 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात एक लाख 98 हजार 706 कोरोना बाधित आढळून आले आहेत.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मागील 24 तासांमध्ये 8171 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तसेच 204 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात एक लाख 98 हजार 706 कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 5598 लोकांचा मृत्यू झाला असून 95 हजार 527 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.

देशातील एकूण कोरोना बळींपैकी 94 टक्के मृत्यू फक्त 8 राज्यात

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार हा काही राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 98 हजार 706 इतका आहे. तर 5598 लोकांचा मृत्यू झाला असून 95 हजार 527 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, देशातील एकूण बळींपैकी 94 टक्के बळी हे फक्त 8 राज्यात झाल्याची नोंद झाली आहे.

जवळपास 75 टक्के रुग्ण आणि 83 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यांमध्ये

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 75 टक्के रुग्ण आणि 83 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यांमध्ये झाले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या एकूण रुग्णांपैकी 75.33% रुग्ण ज्या 6 राज्यांमध्ये आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश होतो. सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्र, तमिलनाडु, दिल्ली आणि गुजरातमध्ये आहे. या राज्यांमध्ये दररोज वेगाने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

पाहा व्हिडीओ : राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला, आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून दिलासादायक माहिती!

कोरोनामुक्त होणाऱ्यांचा सरासरी वेग 48.19%

देशात उपचारानंतर कोरोनामुक्त होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांचा सरासरी वेग 48.19 टक्के इतका आहे. उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा सरासरी दर 18 मे रोजी 38.29% इतका होता. 3 मे रोजी 26.59% एवढा होता आणि 15 एप्रिल रोजी हा दर 11.42% एवढा होता. सध्या देशात 93,322 लोकांवर उपचार सुरु आहेत.

लॉकडाऊन वाढला

देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

भीम अॅपच्या 70 लाख युझर्सचा डेटा ऑनलाईन लीक झाल्याचा इस्त्रायली फर्मचा दावा, सरकारने दावा फेटाळला

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, मजुरांसह सूक्ष्म, लघु अन् मध्यम उद्योगांसाठी मोठ्या घोषणा

निर्मला सीतारमण यांचं अर्थमंत्रीपद राहणार की जाणार? केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget