नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 16 हजारावर गेलीआहे. सध्या देशातील 16 हजार 616 जणांना कोरोनाची लागण झाली असून 519 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2301 रुग्ण बरे झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एका दिवसात 1334 नविन रुग्ण आढळले आहे.


भारतात रुग्ण बरे होण्याचा आकडा 14.19 टक्के आहे. देशातील 23 राज्य असे आहेत की गेल्या 10 दिवसात आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, देशामध्ये कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये 70, गुजरातमध्ये 58, दिल्ली 43, तेलंगणा 18, आंध्रप्रदेश 15, कर्नाटक 14, उत्तर प्रदेशमध्ये 17, पंजाब 16, पश्चिम बंगाल 12, राजस्थान 11, जम्मू कश्मिर 5, हरियाणा 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार, आसाम, हिमाचल आणि ओडिसा मध्ये प्रत्येत एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 4200 रुग्ण आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीमध्ये 1 हजार 893 रुग्ण आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर असून त्याठिकाणी 1 हजार 407 रुग्ण आढळले आहेत.


आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल म्हणाले, लक्षणविरहीत कोरोना पाझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या जास्त नाही. परंतु तरीही जे कोरोनाबाधित क्षेत्र आहे तिथे टेस्ट केली जात आहे. आयसीएमआरचे अध्यक्ष गंगाखेडकर म्हणाले, देशात आतापर्यंत 3 लाख 86 हजार 791 टेस्ट करण्यात आल्या आहेत.


जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 24,06,823 वर पोहोचली आहे. 1,65,054 लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये 763,832, स्पेनमध्ये 198,674, इटलीमध्ये 178,972, फ्रान्समध्ये 152,894 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेमध्ये 40,553, स्पेनमध्ये 20,453, इटलीमध्ये 23,660, फ्रान्समध्ये 19,718, चीनमध्ये 4,632 लोकांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या :

Coronavirus World Update | जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 लाख पार; आतापर्यंत 1.65 लाख जणांचा मृत्यू





Maharashtra Corona | महाराष्ट्रात पहिल्यांदाच 552 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, राज्यात एकूण 4हजार 200 कोरोनाबाधित