मुंबई : लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाने नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे. ही नवी नियमावली प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणजे जेथे कोरोना हॉटस्पॉट आहे ते सोडून इतर क्षेत्रात लागू होणे अपेक्षित आहे. यात अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषय्क बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून मनरेगा अंतर्गत कामे करण्याचा समावेश या अधिसूचनेत करण्यात आला आहे. उद्या म्हणजे 20 एप्रिलपासून याची अमलबजावणी होणार आहे.
मनरेगा

  • मनरेगाचं काम सोशल डिस्टन्सिंग पाळून सुरू होणार.

  • सिंचन आणि पाणी वाचवण्याच्या संबंधाबाबत कामे मनरेगामध्ये प्राधान्याने सुरू होणार.


खासगी क्षेत्र

  • इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि DTH केबल सर्व्हिस, आयटी आणि त्यासंबंधित सेवा सुरू राहतील. मात्र, 50 टक्के कर्मचारी काम करणार.

  • डेटा आणि कॉल सेंटर कमीतकमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू राहणार.

  • ग्रामपंचायत स्तरावरील सरकारमान्य सेवा सुविधा केंद्र सुरू राहणार.

  • ई कॉमर्स कंपनी, कुरियर सर्व्हिस सुरु राहणार.


औद्योगिक क्षेत्र

  • घाऊक (व्होलसेल) आणि वितरण डिस्ट्रिब्युशन सेवा, प्रतिबंध क्षेत्र वगळून सेज, इंडस्ट्रियल इस्टेट आणि इंडस्ट्रियल टाऊनशीपमध्ये

  • उत्पादन करणारे कारखाने सुरू होणार.

  • कारखान्यांच्या परिसरात कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी.

  • कामाच्या ठिकाणी कर्मचारी येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी. त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळावे.

  • प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कोणतीही व्यक्ती अशा ठिकाणी कामावर येऊ शकणार नाही.

  • प्रतिबंधित क्षेत्र वगळून ग्रामीण भागातील कारखाने, फळे आणि फुले यासंबंधित प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि वाहतूक सेवा सुरू राहणार.


बांधकाम संबंधित काम

  • रस्ते, सिंचन प्रकल्प, इमारत बांधकाम उद्योग संबंधित प्रकल्प, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात बांधकाम कामांसाठी बाहेरून

  • कामगार आणावे लागणार नाहीत. अशा कामाबाबत आयुक्तांनी निर्णय घ्यावा.

  • मान्सून पूर्व अत्यावश्यक कामे सुरू होणार.

  • राज्य सरकारच्या कार्यलयात सचिव, सहसचिव, उपसचिव यांनी आपल्या खात्यात 10 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीत काम करावे.


मुंबई महानगरपालिका
शहरात लॉकडाऊनच्या काळात कंटेटमेंट झोन/हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणची बंद असलेली बांधकामे आणि मुंबईतील पावसाळ्यापूर्वी प्ररशासनानं करावयाची कामे सुरु होणार आहेत. मात्र, यासाठी प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्ययक आहे. सार्वजनिक स्वरूपाचे प्रकल्प, रस्ते व पूल विषयक दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, पर्जन्य जलवाहिन्यांची कामे, पाणी पुरवठा विषयक कार्ये, पावसाळापूर्व कामे इत्यादी कामांशी संबंधित बांधकामांना देखील 'लॉक डाऊन' मधून काही प्रमाणात सूट मिळणार आहे. त्यासाठी प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झाली आहे.


Cancer Patients | हिंदमाता पुलाखालील कॅन्सर रुग्णांची हॉटेलमध्ये राहण्याची अवस्था, 'माझा'च्या बातमीची प्रशासनाकडून दखल