मुंबई : राज्यात आज दिवसभरातील सर्वाधिक 552 कोरोना बाधितांची नोंद झाली. यात सर्वाधिक मुंबईत 132 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्याखालोखाल पुण्यात 49 जणांना कोरोनाची लागण झाली. परिणामी राज्यातील आकडा 4200 झाला आहे. आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात 12 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. यातील सहा मृत्यू हे मुंबईत, चार मालेगाव आणि प्रत्येकी एक सोलापूर मनपा आणि अहमदनगर येथील जामखेडमधील आहे. आज रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यासाठी काळजीचं कारण झालं आहे. विशेषतः मुंबई, पुण्यातील वाढते रुग्ण सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 4200
- मुंबई महानगरपालिका - 2724 (मृत्यू 132)
- ठाणे - 20 (मृत्यू 2)
- ठाणे महानगरपालिका- 110 (मृत्यू 2)
- नवी मुंबई मनपा - 72 (मृत्यू 3)
- कल्याण डोंबिवली - 69 (मृत्यू 2)
- उल्हासनगर - 1
- भिवंडी, निजामपूर - 5
- मिरा-भाईंदर - 71 (मृत्यू 2)
- पालघर - 17 (मृत्यू 1 )
- वसई- विरार - 85 (मृत्यू 3)
- रायगड - 13
- पनवेल - 27 (मृत्यू 1)
- नाशिक - 4
- नाशिक मनपा - 5
- मालेगाव मनपा - 78 (मृत्यू 6)
- अहमदनगर - 21 (मृत्यू 1)
- अहमदनगर मनपा - 8
- धुळे -1 (मृत्यू 1)
- जळगाव - 1
- जळगाव मनपा - 2 (मृत्यू 1)
- पुणे - 17 (मृत्यू 1)
- पुणे मनपा - 546 (मृत्यू 49)
- पिंपरी-चिंचवड मनपा - 48 (मृत्यू 1)
- सातारा - 11 (मृत्यू 2)
- सोलापूर मनपा - 15 (मृत्यू 2)
- कोल्हापूर - 3
- कोल्हापूर मनपा - 3
- सांगली - 26
- सिंधुदुर्ग - 1
- रत्नागिरी - 6 (मृत्यू 1)
- औरंगाबाद मनपा - 30 (मृत्यू 3)
- जालना - 1
- हिंगोली - 1
- परभणी मनपा - 1
- लातूर - 8
- उस्मानाबाद - 3
- बीड - 1
- अकोला - 7 (मृत्यू 1)
- अकोला मनपा - 9
- अमरावती मनपा - 6 (मृत्यू 1)
- यवतमाळ - 14
- बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
- वाशिम - 1
- नागपूर - 2
- नागपूर मनपा - 67 (मृत्यू 1)
- चंद्रपूर मनपा - 2
- गोंदिया - 1
- इतर राज्ये 13 (मृत्यू 2)
औरंगाबादकरांसाठी खुशखबर! आज एकाच दिवशी पाचजण कोरोनामुक्त
आज राज्यात 12 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्ंयूपैकी मुंबई येथील 6 आणि मालेगाव 4 तर 1 मृत्यू सोलापूर मनपा आणि 1 मृत्यू अहमदनगर जामखेड येथील आहे. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 72,023 नमुन्यांपैकी 67,673 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 4200 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यात सध्या 368 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 6359 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 23.97 लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केलं आहे. आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 87,254 लोक होम क्वॉरंटाईन असून 6743 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
Ramdev Baba | लॉकडाऊनच्या काळात मन प्रसन्न ठेवण्यासाठी ही योगासंन करा, रामदेव बाबांचं मार्गदर्शन