Coronavirus Update : कोरोना व्हायरस (Coronavirus) नं गेल्या दोन वर्षांत सर्वांची धाकधुक वाढवली आहे. आतापर्यंत या व्हायरसबाबत अनेकांच्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. काही लोकांचा तर असाही समज आहे की, कोरोना पर्व आता संपलं आहे. पण हा समज चुकीचा आहे. कारण देशात दररोज 3 लाखांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची झपाट्यानं वाढ होत आहे. 


कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं WHO नं नवा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओ म्हणतं की, कोरोनाचा ओमायक्रॉन हा शेवटचा व्हेरियंट नाही,  BA.2 सारखे स्ट्रेन भविष्यात अनेक दिसून येतील. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंट आता देशात कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यावर पोहोचला आहे. याचा अर्थ असा आहे की, कोणतीही व्यक्ती, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येता किंवा संक्रमित ठिकाणी भेट न देता, कोरोना पॉझिटिव्ह होईल. 


6 फेब्रुवारीपासून कोरोनाचा जोर वाढणार 


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासच्या एका अभ्यासानुसार, 6 फेब्रुवारीपर्यंत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार आहे. म्हणजेच, पुढील 2 आठवड्यांपर्यंत 6 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असतील. अभ्यासात म्हटलं आहे की, 'आर-व्हॅल्यू', जे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार दर सांगते, ते 14 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान आणखी कमी होऊन 1.57 वर आलं आहे. जर हा दर एकापेक्षा कमी झाला तर असं मानलं जातं की, जागतिक महामारी संपली आहे.


चाचणीमार्फत सब व्हेरियंट्स ओळखणं कठिण 


दुसरीकडे, बनारस हिंदू विद्यापीठाचे व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर सुनीत के. सिंह म्हणतात की, कोरोनाचे नवीन प्रकार चिंतेचा विषय आहेत. ओमायक्रॉनचा जो नवा व्हेरियंट समोर येत आहे. चाचणी मार्फत त्याची ओळख करणं अवघड आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची ओळख जिनोम सिक्वेंसिंगद्वारे केली जाऊ शकते. परंतु, जोपर्यंत जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येतो. तोपर्यंत त्या व्यक्तीमुळं इतरांना त्याची बाधा झालेली असते. म्हणजेच, संसर्गाचा वेग अधिक असतो. 


गेल्या आठवड्यात बाधितांमध्ये 150% वाढ


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अनेकांसाठी चिंतेचा विषय असू शकत नाही, परंतु व्हायरसमध्ये वारंवार होणाऱ्या उत्परिवर्तनामुळे हा प्रकार किती धोकादायक असू शकतो, याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेला चिंता आहे. WHO चं म्हणणं आहे की, भारतात कोरोना संसर्गाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे दक्षिण-पूर्व आशियामध्ये संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका आठवड्यात भारतात कोविड रुग्णांच्या संख्येत 150 टक्क्यांची वाढ झाली आहे. 23 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात येथे कोरोनाचे 15,94,160 नवीन रुग्ण नोंदवले गेले, तर गेल्या आठवड्यात हा आकडा 6,38,872 होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha