Post Omicron Effect : कोरोनाच्या (Corona) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंट या नवीन प्रकाराने जगभरात खळबळ माजवली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा (Delta) व्हेरियंटपेक्षाही धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांमध्ये विविध लक्षणे (Symtoms) दिसतात, त्याचा परिणाम अनेक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसत आहे. संशोधक सध्या ओमायक्रॉन संसर्गाच्या परिणामांवर संशोधन करत आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की ओमायक्रॉनचे एक लक्षण अनेक महिने टिकू शकते आणि त्रासदायकही ठरू शकते.


संशोधकाचे म्हणणे आहे की, हे लक्षण दूर होण्यास सुमारे एक वर्षाचा काळ लागू शकते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील (Oxford University) संशोधकांनी हे लक्षण ब्रेन फॉग (Brain Fog) म्हणून ओळखले आहे. याचा तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा तुमच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातून बरे झाल्यानंतर दिर्घकाळ कोविडची लक्षणे जाणवत असल्याचे या संशोधनात समोर आलं आहे, ज्यामध्ये इतरांमध्ये ब्रेन फॉगचा समावेश आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि संज्ञानात्मक समस्या उद्भवतात


संशोधकांच्या मते, या काळात व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत, परंतु त्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होईल, ज्यामुळे तुम्हाला विसरण्याचा त्रास होत राहील. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर डॉ. सिजिया झाओ यांनी सांगितले की, हे आश्चर्यकारक आहे की या कोरोना रुग्णांना चाचणीच्या वेळी कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवली नाहीत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha