एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधी पक्ष नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत : सूत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत आज संवाद साधला. लॉकडाऊन उठवू नये अं सर्व नेत्यांचा कल होता. या चर्चेनंतर बोलताना नरेंद्र मोदींनीही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येते आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन वाढवला पाहिजे, असं जवळपास सर्वच विरोधी पक्षीय नेत्यांचं म्हणणं आहे. ज्या काही सूचना मिळत आहेत, त्यानुसार लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने झुकतं माप आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कोणकोणत्या नेत्यांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यामातून लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त तृणमुल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, बसपाचे सतीशचंद्र मिश्रा, डीएमकेचे टीआर वालू, बीजेडीचे पिनाकी मिश्रा, वायएसआरचे मिथुन रेड्डी, सपाचे राम गोपाल यादव, जेडीयूचे राजीव रंजन सिंह, एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान, अकाली दलाचे सुखवीर सिंह बादल यांच्यासह अन्य काही नेत्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलला संपत आहे. आज लॉकडाऊनचा 15 वा दिवस आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांना घरात राहणे आजही गरजेचं आहे. कारण देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विविध राज्यांची सरकारच नव्हे, तर तज्ज्ञांनीही लॉकडाऊन वाढवण्याची गरज बोलून दाखवली आहे.

देशीतील कोरोनाची सद्यस्थिती

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहेत. आतापर्यंत देशात 5194 रुग्ण आढळले आहेत, तर 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह उपचारानंतर 401 लोक बरे झाले आहेत. देशात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली असून आतापर्यंत 1018 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 64 लोकांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

Lockdown | लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर केंद्र स्तरावर मंथन सुरु

Coronavirus Update | काय आहे केंद्राचा कोरोनासंदर्भातील मास्टर प्लॅन?

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget