नवी दिल्ली : कोरोनाच्या (Coronavirus)  सावटातून आपण आता कुठे सावरतोय तोच एका नव्या विषाणूचं सावट जगाला भेडसावतं आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं 'ओमिक्रॉन' ((B.1.1.529) असं केलंय. जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरु असतानाच भारताची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 


दक्षिण आफ्रिकेवरून भारतात बंगळूरू विमानतळावर दाखल झालेल्या दोन जणांमध्ये कोरोनाचे नवा स्ट्रेन आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.  या सर्वांना ट्रॅक करून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बंगळूरुच्या केम्पेगौडा  विमानतळावर  शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. या विमानात 594 प्रवासी होते. त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेचे नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत. 


 बंगळूरूचे आयुक्त के. श्रीनिवास म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतून आलेले  दोन नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत. परंतु ओमेक्रॉन स्ट्रेनबाबत अहवाल आल्यानंतरच माहिती मिळेल. विमानात 594 प्रवासी होते त्यापैकी 94 प्रवासी हे दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आहेत. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून या सर्व रुग्णांना 'आयसोलेशन'मध्ये ठेवण्यात आलंय. तसंच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलंय. अजूनही काही प्रवाशांची माहिती घेणं सुरू आहे.


अत्यंत वेगानं फैलावत जाणाच्या गुणधर्मामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन अतिशय धोकादायक असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे देशात याबद्दल अधिक सतर्कता बाळगण्यात येते आहे. सध्या तयार करण्यात येत असलेल्या लशी करोनाचा नव्या स्ट्रेनवर कितीपत फायदेशीर ठरतील, हे सांगणंदेखील तज्ज्ञांना कठीण जातंय, त्यामुळे या धोक्याला दूर ठेवणं हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं सध्यातरी दिसतंय.


24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची नोंद जागतिक आरोग्य संघटनेनं केली. त्यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्ये देखील हा नवीन व्हेरिएंट आढळला.  नव्या व्हेरिएंटचा धोका ओळखून बर्‍याच देशांनी आता दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी किंवा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.  दक्षिण आफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे, बोत्सवाना, लेसोथो आणि इस्वाटिनी येथील प्रवासी यूके किंवा आयरिश नागरिक किंवा यूकेचे रहिवासी असल्याशिवाय यूकेमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.


Omicron Variant : आता सरकारने कोणती तातडीची पावलं उचलायला हवी? ABP Majha



संबंधित बातम्या :