नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच देशात गेल्या 24 तासांत संसर्ग झालेले 6387 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. मागील 24 तासांत 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात एक लाख 51 हजार 767 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, 4387 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 64 हजार 425 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती उत्तम : आरोग्य मंत्रालय


देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परंतु, केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात परिस्थिती उत्तम आहे. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात रिकव्हरी रेट म्हणजेच, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत आहे. तर मृत्यूदरही सतत कमी होत असल्याचं दिसत आहे. जगभरातील इतर देशांशी तुलना केल्यानंतर भारतातील परिस्थिती ठिक आहे.


महाराष्ट्रात काल 2 हजार 091 कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तर 1168 रुग्ण बरे झाले. तर दिवसभरात सर्वाधिक 97 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 54 हजार 758 वर पोहोचला आहे. त्यातील 16 हजार 954 रुग्ण बरे झाले. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 36 हजार 004 रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा 1792 वर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 30.96 टक्के एवढा आहे. तर एकट्या मुंबई शहरात 32 हजार 974 कोरोनाबाधित असून त्यातील 1065 जणांचा मृत्यू झाला आहे.


केरळमध्ये 936 रुग्ण असून त्यातील 542 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रिकव्हरी रेट 56.28 टक्के एवढा आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांत केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 56 टक्क्यांवर आला आहे.


पाहा व्हिडीओ : गल्ली ते दिल्ली कोरोनासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा | बातम्यांचं अर्धशतक



महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य


तामिळनाडू 17,728 रुग्ण, 9,342 बरे झाले, मृतांचा आकडा 127, रिकव्हरी रेट 52.69 टक्के


गुजरात 14,821 रुग्ण, 7,139 बरे झाले, मृतांचा आकडा 915, रिकव्हरी रेट 48.16६ टक्के


दिल्ली 14,465 रुग्ण, 7,223 बरे झाले, मृतांचा आकडा 288, रिकव्हरी रेट 49.93 टक्के


राजस्थान 7,536 रुग्ण, 4,171 बरे झाले, मृतांचा आकडा 170, रिकव्हरी रेट 55.34 टक्के


मध्यप्रदेश 7,024 रुग्ण, 3,689 बरे झाले, मृतांचा आकडा 305, रिकव्हरी रेट 52.51 टक्के


उत्तरप्रदेश 6,548 रुग्ण, 3,698 बरे झाले, मृतांचा आकडा 170, रिकव्हरी रेट 56.47 टक्के


पश्चिम बंगाल 4,009 रुग्ण, 1,486 बरे झाले , मृतांचा आकडा 283, रिकव्हरी रेट 37.06 टक्के


भारतात रिकव्हरी रेट 41.60%


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाचा रिकव्हरी रेट 41.60% एवढा आहे. मार्चमध्ये रिकव्हरी रेट 7.1% एवढा होता. देशाचा रिकव्हरी रेट हळूहळू सुधारला आहे. तसेच देशाचा मृत्यूदर 2.87% एवढा आहे. फ्रान्समध्ये 19.9 टक्के एवढा मृत्यू दर होता. भारतात प्रति लाख मृतांचा आकडा 0.3% इतका आहे. तर भारतात प्रतिलाख कमी मृत्यूदर आणि कोरोना बाधितांची संख्या कमी ठेवण्यासाठी लॉकडाऊनची सर्वात मोठी भूमिका आहे. सोशल डिस्टन्सिगचा एखाद्या सोशल वॅक्सिनप्रमाणे वापर करा. आयसीएमआर महानिर्देशक बलराम भार्गव यांनी सांगितलं की, '612 लॅब्समध्ये सध्या चाचण्या केल्या जात आहेत. मागील तीन महिन्यांमध्ये तपासण्या अनेक पटींनी वाढवण्यात आल्या आहेत.'


हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर केल्यामुळे सध्या कोणतंचं नुकसान नाही : ICMR


आईसीएमआरने हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनसंदर्भात बोलताना सांगितले की, कोविड नवा आजार आहे. अद्याप यावर उपचार करण्यासाठी काय करावं हे कोणालाच माहिती नाही. बायोलॉजिकल पलॉजीबिलिटीची कारणं आणि आम्हीही विट्रो टेस्ट केल्या होत्या. असं मानलं जातं की, याचे अॅन्टी व्हायरल गुण आहेत. एम्स आणि दिल्लीतील तीन खाजगी रुग्णालांमध्ये यासंदर्भात एक कंट्रोल संशोधन करण्यात आलं होतं. त्यामधून हे औषध फायदेशीर ठरू शकतं आणि याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचं समोर आलं होतं. त्याचबरोबर या औषधाचा वापर करताना ईसीजी करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.


संंबंधित बातम्या : 


चीनसोबत तणाव, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लष्करप्रमुखांसोबत बैठक, तिन्ही दलांनी दिल्या तयारीच्या ब्लूप्रिंट


चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्याला तयार राहण्याचे आदेश, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची तिन्ही दलाच्या प्रमुखांशी चर्चा


कोरोनाबाधितांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या क्लिनिकल ट्रायलवर बंदी; WHOचे आदेश