नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं वाढतं संकट लक्षात घेत त्यावर जगभरात औषधाचं संशोधन सुरु आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाबाधित रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या देत आहे. जगभरातील अनेक देशांनी या औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे. आता जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने देखील याचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी मलेरियाचं औषध वापरु नये, असं डब्लूएचओने सांगितलं आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी सांगितले की, खबरदारी म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची क्लिनिकल चाचणी तात्पुरती बंद केली आहे. हा निर्णय एका रिपोर्टच्या आधारे घेतल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. या रिपोर्टमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या रिपोर्टच्या आधारावर या गोळ्यांचा वापर बंद केल्याचं डब्ल्यूएचओने सांगितंल आहे.


पाहा व्हिडीओ : पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत असल्याचं निरीक्षण



डब्लूएचओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी मलेरिया आणि अन्य आजारांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्विनचा कोरोनाच्या उपचारासाठी वापर करण्याबाबत इशारा दिला होता. या गोळ्यांना क्लिनिकल ट्रायलमध्ये वापरण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.


हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कशासाठी होतो?


हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचं भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. मलेरियासारख्या आजारावंर उपचारासाठी या गोळ्यांचा वापर होतो. मलेरियाशिवाय या औषधाचा वापर आर्थरायटिसमध्येही केला जातो. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या गोळ्या दिल्या जात आहेत. याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. त्यामुळे इतर देशातही या गोळ्यांची मागणी अचानक वाढली आहे. या गोळ्यांचा खास परिणाम सार्स-सीओव्ही-2 वर होतो. हा तोच व्हायरस आहे, ज्यामुळे कोविड-2 ची लागण होते. त्यामुळेच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना दिल्या जात आहेत.


संबंधित बातम्या : 


जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 55 लाखांवर तर 23.61 लाख कोरोनामुक्त


आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी सायकल प्रवास, 15 वर्षीय ज्योतीचं इवांका ट्रम्पनंही केलं कौतुक