एक्स्प्लोर

अमरनाथ यात्रेबाबत सस्पेंस कायम, यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे

23 जूनपासून ही यात्रा सुरू होणार होती. मात्र कोरोनाची स्थिती पाहून बोर्डाने यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र जम्मू आणि काश्मीरच्या माहिती विभागाने याबाबत काढलेलं पत्रक मागे घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

जम्मू : यंदा अमरनाथ यात्रा होणार की नाही याबाबत सस्पेन्स अजून कायम आहे. बुधवारी यासंदर्भात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. कोरोनाचा प्रसार देशामध्ये वेगाने होत आहे. यामुळे यावर्षीची ऐतिहासिक अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात अमरनाथ बोर्डाची जम्मूत बैठक झाली होती. या बैठकीत यात्रा रद्द करण्याबाबत उप राज्यपाल गिरीषचंद्र मुर्मू यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या माहिती संचालनालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. 23 जूनपासून ही यात्रा सुरू होणार होती. मात्र कोरोनाची स्थिती पाहून बोर्डाने यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र जम्मू आणि काश्मीरच्या माहिती विभागाने याबाबत काढलेलं पत्रक मागे घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. अखेर राजभवनच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी 23 जूनपासून ही यात्रा सुरू होणार होती. पण कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली. यावर्षीच्या अमरनाथ यात्रेबाबतच्या स्थितीबाबत स्पष्ट करताना रात्री 8.44 वाजता दिलेल्या प्रेसनोटमध्ये राजभवन जम्मू यांच्याकडून सांगण्यात आलं आहे की, आजची स्थिती पाहून अमरनाथ यात्रा करणं शक्य नाही. सध्या कोरोना महामारीचा वेग जास्त आहे. येत्या काळात परिस्थितीचा अंदाज घेऊन अमरनाथ यात्रा आयोजनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. त्याआधी 7:06 मिनिटांनी आलेल्या प्रेसनोटमध्ये अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल आणि अमरनाथ देवस्थान मंडळचे अध्यक्ष गिरीश चंद्र मुर्मू यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरनाथ यात्रा काश्मीर खोऱ्यातून ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावर करोनाचे 77 रेड झोन आहेत. यामुळे लंगर उभारणं, वैद्यकीय सुविधा, छावण्या, सामानाची वाहतूक आणि रस्त्यावर पडलेला बर्फ हटवणं शक्य होणार नाही. म्हणून यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करावी, असा निर्णय झाला होता. नायब राज्यपाल मुर्मू म्हटलं आहे की, सरकारने लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला आहे. पण कोरोनामुळे देशातील व्यवहार कधीपर्यंत बंद राहतील हे अद्याप स्पष्ट नाही. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा सरकार आणि प्रशासनाकडून प्राधान्याने विचार करण्यात येतोय, असं त्यांनी सांगितलं. श्री अमरनाथ श्राइन बोर्ड यंदा प्रथम पूजा आणि संपन्न पूजा या कार्यक्रमासह पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्याबाबत विचार करत आहे, अशीही माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; नोकरदारांचा खोळंबा
Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; नोकरदारांचा खोळंबा
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
India Rain Deficit : 'एल निनो'चा प्रभाव, राज्यासह देशात संकाटाचे ढग गडद; जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; भारतात मान्सूनच्या पावसाची तूट 40 टक्क्यांवर, IMD चा अंदाज काय?
'एल निनो'चा प्रभाव, राज्यासह देशात संकाटाचे ढग गडद; जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; भारतात मान्सूनच्या पावसाची तूट 40 टक्क्यांवर, IMD चा अंदाज काय?

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
England vs India, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
Devendra Fadnavis: ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
Ketan Agrawal Case Pune: इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
Beed Crime News: बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
Ketan Agrawal Case Pune: केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
Vaibhav Sooryavanshi Post Viral : आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
Embed widget