नवी दिल्ली : कोरोनाचा देशातला दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. या महिलेचा मुलगा स्वित्झरलॅंड आणि इटलीच्या दौऱ्यावरुन आला होता. त्याला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्याकडून आईला कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा देखील त्रास होता, अशी माहिती देखील मिळाली आहे. दरम्यान भारतात COVID -19 अर्थात कोरोनाचा हा दुसरा बळी ठरला आहे. याआधी कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये झाला होता वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

माहितीनुसार या मृत महिलेचा मुलगा  23 फेब्रुवारीला स्वित्झरलॅंड आणि इटलीच्या दौऱ्यावरुन आला होता. तो ज्यावेळी भारतात आला त्यावेळी त्याच्यामध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणं नव्हती. मात्र नंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर मुलापासून आईला कोरोनाची लागण झाली.  कोरोना व्हायरसमुळं या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. असं असलं तरी या महिलेला  मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा देखील त्रास होता, अशी माहिती देखील मिळाली आहे.

काल, गुरुवारी कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. जगातील तब्बल शंभरहून अधिक देशात कोरानाचा फैलाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून महारोगाईची घोषणा केली असून जगभरात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातही आज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईत 3, पुण्यात 10, नागपुरात 3, ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित


कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.


परदेशातून येणाऱ्यांचे व्हिसा रद्द


परदेशातून भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत सस्पेंड करण्यात आले आहेत. यामधून राजनीतीज्ञ आणि यूएन कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून येणारे भारतीय 14 दिवसांसाठी देखरेखीखाली असतील.



संंबंधित बातम्या : 


#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप

Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण


Corona Virus | असंवेदनशीलतेचा कळस, कोरोना पीडित रुग्णाच्या कुटुंबाला वाळीत टाकलं


#CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे