Coronavirus Updates in India : देशात XBB व्हेरियंटच्या (XBB Variant) रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. गुजरातमध्ये (Gujrat) एक नवीन रुग्ण आढळला आहे. यासोबतच अमेरिकेत (America) धुमाकूळ घालणाऱ्या XBB.1.5 सब व्हेरियंटच्या (Coronavirus XBB 1.5 Variant) भारतातील रुग्णांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. सध्या देशात कोरोनाच्या XBB व्हेरियंटचे (XBB Variant) गुजरातमध्ये (Gujrat Corona Patients) तीन रुग्ण आढळले असून कर्नाटक (Karnataka) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला आहे.   


Coronavirus Cases Today in India : देशात 132 नवे कोरोना रुग्ण


भारतात आज 132 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, असून सक्रिय रुग्णांची संख्या 2,582 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या 5,30,707 इतकी झाली आहे. दरम्यान, चीनसह आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे देशही वाढत्या कोरोना संसर्गाच्या देशांच्या यादीत सामील झाले आहेत. 


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,582 वर


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,582 वर पोहोचली आहे, तर 134 नवीन रुग्ण सापडले आहेत. सोमवारी देशात 173 नवीन कोरोनाबाधित आणि 2670 सक्रिय रुग्ण होते. देशातील कोरोना संसर्ग घटताना दिसत आहे. पण नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जगभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क आहे. खबरदारीची पावले उचलली जात आहेत. कोविड चाचणी आणि लसीकरणावर भर दिला जात आहे.


जगभरात कोरोनाचा कहर


जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. या पार्श्वभूमीवर या सहा देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.


Superbug Bacteria Threat : कोरोनानंतर आता 'सुपरबग'चा धोका


कोरोनानंतर 'सुपरबग' दुसरा सर्वात मोठा धोका बनणार आहे. काही दिवसांपासून अमेरिकेत सुपरबग जीवाणूमुळे वेगाने पसरत आहे. यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या सुपरबगमुळे मानवाला लैंगिक संक्रमित रोग (STI) होतात, ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. सुपरबग हा साधारणपणे बॅक्टेरियाचे एक प्रकार असतो. मानवी शरीरात अनेक जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. सुपरबग'बाबत अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.