Covid19 : धोका कायम! देशात 173 नवीन कोरोनाबाधित, 2670 सक्रिय रुग्ण
जगभरात कोरोना विषाणू पुन्हा एकदा धुमाकूळ घालताना दिसत आहे. चीनपाठोपाठ जपानमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसे असले तरी, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे.
चीनपाठोपाठ जपानमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांमध्ये BF.7 व्हेरियंटचा संसर्ग पसरला असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. अमेरिकेमध्ये XBB व्हेरियंट संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसत आहे.
भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकारकडून योग्य उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.
जगभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. भारतात सध्या कोरोनाचे 2670 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका पाहता, महाराष्ट्रात नागरिकांनी लसीकरणाचा पर्याय निवडला आहे. गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील लसीकरणात तिपटीने वाढ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना संसर्गाची प्रकरणे आता 4,46,78,822 वर पोहोचली आहेत. यामधील 4,41,45,445 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.
केरळ आणि कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. देशातील निम्म्याहून अधिक कोरोनाचे रुग्ण फक्त केरळमध्ये आढळूत येत आहेत.
त्यापाठोपाठ कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. केरळमध्ये 1,444 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर कर्नाटकमध्ये 326, महाराष्ट्रात 161, ओडिशात 88 आणि तामिळनाडूमध्ये 86 उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत.
देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र नागरिकांनी खबरदारी बाळगणे फार आवश्यक आहे. मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळा. तसेच बूस्टर डोस न घेतलेल्या लोकांनी लवकरात लवकर बूस्टर डोस घ्या, असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.