Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 822 नवे कोरोनाबाधित, Omicron चे 23 रुग्ण
Coronavirus Cases Today in India : देशात काल (सोमवारी) दिवसभरात 6 हजार 822 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर Omicron व्हेरियंटचे 23 रुग्ण आढळले आहेत.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना (Corona) विषाणूचा कहर सुरुच आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) चिंतेत भर टाकली आहे. देशात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 6 हजार 822 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 220 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 23 रुग्ण सापडले आहेत.
आतापर्यंत 4 लाख 73 हजार 757 कोरोनाबळी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 95 हजार 14 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 73 हजार 757 झाली आहे. आकडेवारीनुसार, सोमवारी दिवसभरात 10 हजार 4 रुग्ण बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 79 हजार 612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 128 कोटींहून लसीचे डोस
देशव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे 128 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात 79 लाख 39 हजार 38 डोस देण्यात आले. आतापर्यंत 128 कोटी 76 लाख 10 हजार 590 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.
देशात ओमायक्रॉनचे 23 रुग्ण, लसवंतानाही संसर्ग
सोमवारी, मुंबईतील दोन लोकांमध्ये ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. दोघेही 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर विषाणू ओमायक्रॉन आहे की नाही हे तपासण्यासाठी एनआयव्ही, पुणे येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुना पाठवण्यात आला. आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 10 झाली आहे. आतापर्यंत, देशात 23 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या :
- Omicron Variant : काळजी घ्या, मास्क वापरा! राज्याची चिंता वाढली, ओमायक्रॉनबाधितांची संख्या 10 वर
- Omicron Variant : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार, बाधितांची संख्या 336वर, प्रशासन हायअलर्टवर
- कोई सरहद ना इने रोके...भारतीय तरुणीला भेटण्यासाठी ओलांडली बॉर्डर, पाकिस्तानी तरुणाला अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha