Coronavirus New Cases Today : जगासह देशातील कोरोना संसर्गाचा फैलाव अद्यापही सुरुच आहे. यामध्ये दिवसागणिक चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 38 रुग्णांनी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि दुसरीकडे पावसाळ्याच पसरणाऱ्या साथीच्या रोगांमुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.


आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचिंत घट झाली असली, तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बुधवारी देशात 18 हजार 930 नवी रुग्ण आढळले होते आणि 35 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजारांपार
देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या देशात 1 लाख 22 हजार 335 रुग्ण कोरोनो संक्रमित आहेत. तर गुरुवारी दिवसभरात 15 हजार 899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह आतापर्यंत भारतात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 29 लाख 37 हजार 876 वर पोहोचली आहे.






भारतात कोरोनाचा नवा सबव्हेरियंट BA 2.75 आढळला
भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा नवा सबव्हेरियंट आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याची नोंद घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितलं आहे की, यासंदर्भात संशोधन सुरु आहे.


सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात


देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुरुवारी 2 हजार 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी 3238 जणांनी कोरोनावर मात केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या