Coronavirus Cases Today in India : जगासह भारतातही कोरोनाचा धोका कायम आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. देशातही कोरोना विषाणूसोबत इतर विषाणूजन्य आजारांनी आरोग्य व्यवस्थेला चिंतेत टाकलं आहे. मुंबईसह देशात गोवर आणि डेंग्यू आजाराचा धोका वाढला आहे. त्यातच एक दिलासादायक बातमी म्हणजे देशात आज कोरोनाबाधितांची संख्या किंचित घटली आहे. देशात गेल्या 24 तासांत एक हजारांहून कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेने आज नऊ रुग्णांची घट झाली आहे. काल देशात गेल्या 24 तासांत 842 कोरोनाबाधित सापडले आहेत आणि सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात 12 हजार 553 सक्रिय कोरोनाबाधित
देशातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्याही किंचित घटली असली, तरी हा आकडा आजही 12 हजारांच्या पुढे आहे. देशात सध्या 12 हजार 553 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. काल ही संख्या 12 हजार 752 इतकी होती. देशात आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे पाच लाख 30 हजारहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात एकूण चार कोटीहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
गेल्या 24 तासांत आठ रुग्णांचा मृत्यू
भारतातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 65 हजार 810 वर पोहोचली आहे. त्यामधील बहुतेक लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात आठ रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोरोना वेग मंदावला असला, तरी संसर्ग कायम आहे. देशात सध्या 12 हजार 553 सक्रिय कोरोना रुग्ण आहे.
काळानुसार कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल
काळानुसार कोरोना विषाणूची धोका कमी झालेला असला, तरी हा धोका पूर्णपणे टळला नसून कोविड19 विषाणूच्या लक्षणांमध्येही बदल झाल्याचं एका अभ्यासात आढळलं आहे. इंग्लंडमधील एका अभ्यासात आढळून आलं आहे की, तोंडाला चव नसणे किंवा गंध न येणे ही कोरोनाची प्रमुख लक्षणं नाहीत. यामध्ये, याव्यतिरिक्त, अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्यांमध्ये प्रामुख्याने चव नसणे किंवा गंध न येणे ही लक्षणं आढळली होती. तुलनेनं ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप येणे आणि श्वासोच्छवास करण्यात अडथळा येणे ही लक्षणं आढळली होती. ब्रिटनमध्ये 17,500 कोरोना रुग्णांवर एक अभ्यास केला गेला