Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 66 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा काल नांदेड जिल्ह्यातून हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. दरम्यान आज, सकाळी  ही भारत जोडो यात्रा दाती फाटा येथून कळमनुरीच्या दिशेने निघाली आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूरवरुन (Kolhapur) दहा हजार नागरिक हिंगोलीत दाखल झाले आहेत. सर्व नागरिक लाल फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.


10 हजार कोल्हापूरकर लाल फेटे बांधून राहुल गांधींच्या स्वागतासाठी सज्ज 


भारत जोडो यात्रा ही काल (11 नोव्हेंबर)  हिंगोली जिल्ह्यात पोहोचली आहे. पाच दिवस ही यात्रा नांदेड (Nanded) जिल्ह्यामध्ये चालली. दरम्यान, काल युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांची गळाभेट झाल्याचे पाहायला मिळालं. भारत जोडो यात्रा आज हिंगोली (Hingoli)  जिल्ह्यातील दाती फाटा येथून कळमनुरीच्या दिशेने निघाली आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूरवरुन दहा हजार नागरिक हिंगोली दाखल झाले आहेत. सर्व नागरिक लाल फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. राहुल गांधी यांना खास कोल्हापुरी कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 


राज्यातील या जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेचा प्रवास 


राज्यातील पाच जिल्ह्यातून जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेचा प्रवास होमार आहे. यातील नांदेड जिल्ह्यातील यात्रेचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोहोचली आहे. राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14  दिवसात या यात्रेचा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. राज्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Bharat Jodo Yatra : आदित्य ठाकरे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत, राहुल गांधींनी घेतली गळाभेट