Petrol-Diesel Price Today 12th November : ऑगस्ट महिन्यात विक्रमी पातळीवर घसरलेल्या कच्च्या तेलात गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. शनिवारी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दरांत मोठी वाढ दिसून आली. अशातच भारतीय तेल कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशात आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 


क्रूड ऑईल प्रति बॅरल 96 डॉलरवर 


गेल्या काही दिवसांत क्रूड ऑईलच्या किमतींत विक्रमी घसरण पाहायला मिळाली होती. ही घसरण रोखण्यासाठी ओपेक (OPEC) देशांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून आला होता. मात्र असं असलं तरीही देशांतर्गत बाजारात गेल्या साडेपाच महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच आहेत. शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड 88.96 डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड 95.99 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. 


देशात बऱ्याच काळापासून पेट्रोल-डिझेल जैसे थेच 


पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारनं 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर नव्या सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 


देशातील महत्त्वाच्या शहरांतील तेलाच्या किमती 


दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर


तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दररोज सकाळी 6 वाजता क्रूडच्या किमतीवर आधारित तेलाचे दर जारी करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यानं देशातील प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).