Coronavirus Cases Today in India : आज देशात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र मृत्यूची संख्या वाढलेली दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 796 नवीन रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 929 नवीन रुग्णांची नोंद आणि सहा जणांचा मृत्यू झाला होता. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार 889 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार 889 इतकी झाली आहे. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 710 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 4 हजार 329 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.20 टक्के आहे.
आतापर्यंत 185 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 185 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात देशात 15 लाख 65 हजार 504 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 185 कोटी 90 लाख 68 हजार 616 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Ghaziabad News : गाझियाबादमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, 100 गायींचा होरपळून मृत्यू
- Deoghar Ropeway Accident : झारखंडमध्ये रोपवे अपघातात आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात यश, 3 जणांचा मृत्यू, सकाळी पुन्हा बचावकार्याला सुरुवात
- Viral : पॅंगाँग तलावात घुसवली कार, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी
- Mumbai City FC नं रचला इतिहास, AFC चॅम्पियन्स लीगमध्ये सामना जिंकणारा पहिला भारतीय संघ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha