Ghaziabad Fire News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील इंदिरापुरम भागातील झोपडपट्टीला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 100 गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इंदिरापुरमच्या झोपडपट्ट्यांतील धुरांचे लोट दुरुनही दिसत होते. सोमवारी इंदिरापुरमच्या झोपडपट्टीत आग लागली. यानंतर स्थानिकांनी अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर होत त्यांनी आग विझवण्याचे काम सुरु केले. श्री कृष्ण गोसेवेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देत सांगितले की, 'भंगाराला लागलेल्या आगीमुळे 100 हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे.' या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गाझियाबादचे जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली.
लहान आगीचं रूपांतर मोठ्या आगीत झालं
मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीच्या बाजूला कचऱ्याचा ढीग होता. तिथे लहान आग लागली आणि त्याचं रूपांतर भीषण आगीत झालं. आगीने संपूर्ण परिसराला वेढल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. सुरुवातीला आग लागल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पाणी टाकून आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र जोरदार ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे आग वाढतच गेली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, झोपडपट्टीत ठेवलेल्या घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. पाहता पाहता आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केलं. या दुर्घटनेत 100 गायींचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Deoghar Ropeway Accident : झारखंडमध्ये रोपवे अपघातात आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात यश, 3 जणांचा मृत्यू, सकाळी पुन्हा बचावकार्याला सुरुवात
- Viral : पॅंगाँग तलावात घुसवली कार, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी
- Viral Video : धक्कादायक! इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाचे दोन तुकडे, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha