Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा कहर सातत्याने कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 3993 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र यावेळी कोरोनाबळींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासांत 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि 66 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 49,948 इतकी झाली आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 5,15,210 वर पोहोचला आहे. एकूण 4 कोटी 24 लाख 6 हजार150 रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 663 दिवसांत पहिल्यांदाच कोविड-19 च्या सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. शेवटच्या वेळी भारतात 4,000 च्या खाली कोरोनाचे नवे रुग्ण 15 मे 2020 रोजी नोंदवण्यात आले होते, तेव्हा देशात 3,967 नवीन रुग्णांची नोंद झाली होती.
दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्या सलग 30 दिवसांपासून एक लाखांपेक्षा कमी आहेत. हा सलग दुसरा दिवस आहे की नवीन प्रकरणांची संख्या 5,000 पेक्षा कमी आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 179.13 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus : फेब्रुवारीमध्ये नोकरभरती प्रक्रियेत 31 टक्क्यांनी वाढ, कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचा परिणाम
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतला घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले
- Ukraine-Russia War: पत्नीला खोटं बोलून घरातून निघाला, अन् युक्रेन सैन्यात सामील झाला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha