Coronavirus Cases Today in India : भारताला कोरोनाचा विळखा काहीसा सैल होताना पाहायला मिळतोय. देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनारुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशात कालच्या तुलनेत आज प्राणघातक कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे तीन लाख 33 हजार 533 नवीन रुग्ण आढळले असून 525 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर 17.78 टक्के इतका झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे कालच्या तुलनेत देशात चार हजार 171 कमी रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशी कोरोनाचे तीन लाख 37 हजार 704 रुग्ण आढळले होते. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.


सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या 21 लाख 87 हजार 205


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या 21 लाख 87 हजार 205 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख 89 हजार 409 झाली आहे. आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात दोन लाख 59 हजार 168 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत तीन कोटी 65 लाख 60 हजार 650 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.





 


आतापर्यंत 161 कोटींहून अधिक डोस देण्यात आले 


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 161 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 71 लाख 10 हजार 445 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 161 कोटी 92 लाख 84 हजार 270 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.


जगभरात कोरोनाचा कहर 


वर्ल्डोमीटर या वेबसाईटनुसार, जगभरात तीन दिवसांत 10 दशलक्षाहून अधिक कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत, तर दररोज सरासरी नऊ हजार लोक आपला जीव गमावत आहेत.


जगातील आतापर्यंतची कोरोनाची स्थिती


एकूण संक्रमित - 34.98 कोटी
बरे झालेले रुग्ण - 27.81 कोटी
सक्रिय प्रकरणे - 6.60 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू - 56 लाख 10 हजारांहून अधिक


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha