Subhash Chandra Bose : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील इंडिया गेटवर (India Gate ) नेताजी सुभाष चंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या होलोग्राम पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. त्यानिमित्ताचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  यासोबतच पंतप्रधान मोदी आज आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाबद्दल देण्यात येणारा नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार प्रदान करतील.  


नेताजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रॅनाइटचा पुतळा तयार होत नाही तोपर्यंत इंडिया गेटवर त्यांचा होलोग्राम पुतळा बसवला जाईल, असे पंतप्रधान म्हणाले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दिल्लीतील इंडिया गेट येथे उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची उंची 25 फूट असेल आणि ती ग्रॅनाइट दगडापासून बनविली जाईल, अशी माहिती नवी दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाचे महासंचालक अद्वैत गडनाईक यांनी दिली. 


सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा पंचम जॉर्ज यांचा पुतळा होता ठिकाणी बसवण्यात येणार आहे. 1968 मध्ये जॉर्ज पंचमचा पुतळा हटवण्यात आला आहे. तेव्हापासून ही छत्री रिकामीच आहे. त्या ठिकाणी आता सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.


होलोग्राम म्हणजे काय? 


होलोग्राफिक हा डिजिटल तंत्रज्ञानाचा एक प्रकार असून हे प्रोजेक्टरसारखे काम करते. त्यात कोणत्याही गोष्टीला 3D आकार दिला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे समोरची गोष्ट खरी असली, तरी ती फक्त 3G डिजिटल इमेज आहे असा भास होतो. या तंत्रज्ञानाच्या वापराने आता पर्यटक आणि दिल्लीकरांना नेताजींचा पुतळा इंडिया गेटवर बसेपर्यंत होलोग्रामद्वारे नेताजींचा पुतळा तिथे असल्याची भावना जगता येणार आहे.


महत्वाच्या बातम्या